"यशवंत दिनकर पेंढरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
साचे
ओळ ३१:
}}
{{विकिकरण}}
'''यशवंत दिनकर पेंढरकर''' ऊर्फ कवी '''यशवंत''' हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "[[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळातील]]' सप्तर्षींमध्ये [[माधव जूलियन]] सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.{{संदर्भ हवा}}
 
आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "[[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळातील]]' सप्तर्षींमध्ये [[माधव जूलियन]] सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.
 
==बालपण==
यशवंत ऊर्फ यशवंत दिनकर पेण्ढरकरपेंढरकर यांचा जन्म [[सातारा]] जिल्ह्यात [[चाफळ]] येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच गेले. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. [[दत्तोपंत पटवर्धन]] यांची [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांची]] युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला'' हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्‍वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.{{संदर्भ हवा}}
 
यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार [[साधुदास]] ऊर्फ [[गो. गो. मुजुमदार]] यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यशवंतांवर पडला. {{संदर्भ हवा}}
 
==पुणे वास्तव्य आणि साहित्यिक सहवास==
पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न [[गिरीश|कवी गिरीश]] त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. [[श्रीधर बाळकृष्ण रानडे|श्री. बा. रानडे]] आणि सौ. [[मनोरमा श्रीधर रानडे]] या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. [[माधव जूलियन]] यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय [[वि. द. घाटे]], प्रा. [[द. ल. गोखले]] आणि [[ग. त्र्यं. माडखोलकर]] होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली.'' काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.{{संदर्भ हवा}}
 
पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न [[गिरीश|कवी गिरीश]] त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. [[श्रीधर बाळकृष्ण रानडे|श्री. बा. रानडे]] आणि सौ. [[मनोरमा श्रीधर रानडे]] या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. [[माधव जूलियन]] यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय [[वि. द. घाटे]], प्रा. [[द. ल. गोखले]] आणि [[ग. त्र्यं. माडखोलकर]] होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली.'' काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.
 
==स्थायीभाव==
Line ८४ ⟶ ८१:
 
जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. "मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे.
यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.{{संदर्भ हवा}}
 
==गद्यलेखन==
Line ९१ ⟶ ८८:
यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी स्टीफन झ्वार्इंग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वार्इंग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे.
 
शेवटी यशवंतांनी झ्वार्इंग यांच्या सपत्‍नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा - झ्वार्इंग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्‍नीसह आत्महत्या केली.{{संदर्भ हवा}}
 
== प्रकाशित साहित्य ==