"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ४९:
सुरुवातीस उदजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H<sub>2</sub> हा वायू [[सल्फ्यूरिक आम्ल]] आणि [[लोह]] ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाई जहाजातही H<sub>2</sub> वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H<sub>2</sub>च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू [[हेलियम]] हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.
 
=== पुंजवादाच्या इतिहासातील भूमिका ===
उदजनच्या [[अणू]]ची रचना अतिशय साधी असते. त्याच्या [[अणुकेंद्र]]ात फक्त एक [[प्राणु]] असतो व त्याभोवती एक [[विजाणू]] फिरत असतो. उदजन अणूच्या अतिशय साध्या रचनेमुळे आणि अणूपासून निघणाऱ्या व शोषल्या जाणाऱ्या प्रकाशपटलाच्या अभ्यासामुळे अणुरचनेचा सिद्धान्त बनवण्याच्या कामात उदजनची खूप मदत झाली. तसेच, उदजनचा [[रेणू]] H<sub>2</sub> ह्याची व त्याचा [[कॅटआयन]] H<sub>2</sub><sup>+</sup> ह्याचीही रचना एकदम साधी असल्याने [[रासायनिक बंध]]ाचे गुणधर्म पूर्णपणे समजून घ्यायलाही त्याचा उपयोग झाला. उदजन अणूचा पुंज-भौतिकी अभ्यास इ.स.च्या १९२० च्या दशकाच्या मध्यास झाला, त्यानंतर वरील सिद्धान्तांचाही विस्तार केला गेला.