"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) No edit summary |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ ६३:
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले.
डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. <ref>{{स्रोत पुस्तक|
==चरित्र==
|