४१
संपादने
===राजकीय विचार===
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम , विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष ई. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पद ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ गाईड करू शकतात. निर्णय हे लोकशाही पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.
संघ आणि परिवारातील कार्यकर्त्यांची कोंग्रेस आणि इतर विरोधकांवरील टिका वेळोवेळी मुद्दांच्या रूळांवरून घसरून व्यक्तिगत बनत जाते.नेहरू उत्तरकाळात काँग्रेस आणि इतर तथाकथीत धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षातील मनापासून धर्मनिरपेक्षता जपणारे नेतृत्व मागे पडून धर्मनिरपेक्षते बद्दल केवळ तोंडदेखली पोपटपंची करणारे निवडणूकांची धार्मीक-जातीय समिकरणे मांडणारे नेतृत्व पुढे येत गेल्याने ते खऱ्या धर्मनिरपेक्षतेस न्याय देऊ शकले नाहीच पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्या धर्मनिरपेक्षतेस तथाकथित म्हणून हिणवण्याचा मार्ग (आणि सांस्कृतीक कमी) आणि राजकीय प्रभाव वाढत गेला.
|
संपादने