[[चित्र:सप्तशृंगी देवी.JPG|right|thumb|300px|सप्तशृंगी देवी]]
[[File:Goddess Saptashrungi Devi Temple..jpg|right|thumb|300px|सप्तशृंगी देवी मंदिर]]
[[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[वणी]] येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची [[महालक्ष्मी]], तुळजापूरची [[तुळजाभवानी]] व माहूरची [[रेणुका]]. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.<ref>[http://epaper.lokmat.com/bigwin.aspx?url=epaperimages//ngp//2362013//d268750-large.jpg&eddate=06/23/2013&pageno=12&edition=9&prntid=4922&bxid=27326788&pgno=12 दि. २३ जून २०१३ च्या लोकमत, नागपूर मधील पान क्र. १२ वरील लेख.]</ref>
'''सप्तशृंगी''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. तो [[नाशिक]] जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या [[सप्तशृंगी देवी|सप्तशृंगी देवीचे]] तीर्थक्षेत्र आहे. हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या [[देवीची साडेतीन पीठे|देवीची साडेतीन पीठांपैकी]] अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे hE मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभार्यालागाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.columbuslost.com/temples/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-/info|शीर्षक=Columbuslost|संकेतस्थळ=www.columbuslost.com|अॅक्सेसदिनांक=2019-07-06}}</ref>
==अलंकार==
देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती [[शेंदूर|शेंदुराने]] लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.
==भौगोलिक स्थान==
हे स्थान [[नाशिक जिल्हा|जिल्ह्यात नाशिकपासून]] उत्तरेस 55५५ किलोमीटर अंतरावरील [[दिंडोरी]]-[[कळवण]] तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे [[माकड|माकडांची]] भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरूवातसुरुवात करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/religious-journey-articles/सप्तश्रृंगीसप्तशृंगी-देवी-का-अर्धशक्तिपीठ-108110800089_1.htm|शीर्षक=saptashrungi devi temple vani nashik {{!}} सप्तश्रृंगीसप्तशृंगी देवी का अर्धशक्तिपीठ|last=WD|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-07-06}}</ref>
==इतिहास==
सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. [[दंडकारण्य|दंडकारण्यात]] राम-[[सीता]] वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. ऐतिहासिकपौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. तसेच महानुभावी [[लीळाचरित्र|लीळाचरित्रात]] असा उल्लेख आढळतो की [[राम]]-[[रावण]] युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने [[लक्ष्मण]] मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. [[नाथ संप्रदाय|नाथ संप्रदायातील]] [[नवनाथ|नवनाथांना]]<nowiki/>शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय [[सुरत|सुरतेची]] लूट केल्यानंतर [[शिवाजी महाराज]] देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ [[बखर|बखरींमध्ये]] नोंदवलेला आढळतो. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरुसुरी झाला किकी खादेशातील लाखो भाविक अनवाणी पायाने चालत येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/marathi/news/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-2/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/78770|शीर्षक=सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला भाविकांची गर्दी|दिनांक=2012-04-07|संकेतस्थळ=24taas.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-07-06}}</ref>
== रूप ==
==स्वरूप==
देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसर्यादुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. व २०१८ पासून उद्वाहक व आगगाडीचारज्जूमार्गाचा वापर सुरुसुरू झाला आहे.
==पूजनपूजा==
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता [[काकड आरती]] होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरवातसुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला [[पंचामृत]] स्नान घालण्यापासून ते [[पैठणी]] अथवा [[शालू]] नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. [[नवरात्र]] आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यातयांत भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही [[नैवेद्य]] म्हणून असते असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. या देवीला साडेतीन पीठातील एक महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे .
==गडावरील इतर ठिकाणे==
==गडावर जाण्याच्या सोई==
गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकनाशिकचे सी.बी.एस. (जुने) मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात. तसेच उत्सव काळात जास्तीच्या एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली असते.तसेच गडावर जाण्यासाठी फेनीक्युलरफेनिक्युलर बस आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=187280:2011-10-10-19-36-33&catid=46:2009-07-15-04-01-48&Itemid=57|शीर्षक=कोजागिरीनिमित्त सप्तश्रृंगीसप्तशृंगी गडासाठी १८५ जादा बसेस|संकेतस्थळ=archive.loksatta.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-07-06}}</ref>
==राहण्याची व भोजनाची सोय==
भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये १९० खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय २४ तास उघडे असते. धर्मशाळेच्या खोलीसाठी आरक्षण पद्धत नाही. गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली एका दिवसासाठी मिळेल.
संस्थानातर्फे केवळ १५ रुपये देणगी मूल्यामध्ये पोटभर प्रसादाची (भोजनाची) सोय करण्यात आली आहे. पौर्णिमा, नवरात्र व चैत्रात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. प्रसादलयात भाविकांसाठी सकाळी ११ ते २.०० व रात्री ७ ते ९.०० या वेळेत प्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे.. एकावेळी दोनतीनशे माणसे बसायची सोय आहे.
==अधिक वाचन==
|