"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
== भूगोल ==
 
==संस्कृति==
===संगीत===
गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात [[बांदोडे]] या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, [[पेडणे]] महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती [[बाळकृशह्णबुवा इचलकरंजीकर]] यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी.
 
सन १८७०च्या सुमारास गायनाचार्य [[रामकृष्णबुवा वझे]] यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.
 
==गोव्यातील रेल्वे स्टेशने==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवा" पासून हुडकले