विलास राजे (इ.स. १९५२:विसापूर, खटाव तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठी लेखक आहेत.

विलास राजे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील करंजे आहे. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते पुण्यातील विद्या महामंडळ प्रशालेतून (सध्याची आपटे प्रशाला) १९६९मध्ये मॅट्रिक झाले. राजे यांनी १९७२ साली आयटीआयचा ड्राफ्ट्‌समनचा अभ्यासक्रम केला व १९८० साली पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधून डी.एम‌.ईची पदविका घेतली. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत ते १९७५ साली वानसन इंडियात (सध्याची थर्मेक्स कंपनी) आले आणि काही काळ प्रोजेक्ट इंजिनिअरची नोकरी करून निवृत्त झाले. १९०१ साली त्यांनी स्वतःची एजन्सी काढली.

निवृत्तीनंतर विलास राजे लिहू लागले. २०१६ सालपर्यंत त्यांचे दोन कथासंग्रह आणि तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले. ’कुंभश्री’ नावाच्या मसिकाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांचा साहित्य प्रवास चालू आहे.

विलास राजे यांची पुस्तके

संपादन
  • कथाकुंभ (कथासंग्रह)
  • चैतन्याचा झरा (वैचारिक लेखसंग्रह)
  • जीवनमुक्त : (गोरा कुंभार यांचे चरित्र)
  • शब्दछंद (कवितासंग्रह)
  • शब्दयात्री (कवितासंग्रह
  • क्षणिका (चारोळीसंग्रह)