विनायक सदाशिव वाळिंबे

विनायक सदाशिव वाळिंबे[] , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[]) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.

विनायक सदाशिव वाळिंबे
जन्म नाव विनायक सदाशिव वाळिंबे []
जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९२८
मृत्यू २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
विषय इतिहास
अपत्ये अभिजित वाळिंबे

विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.

विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते []. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले []. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ.स. १९६२-६३ च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले[]. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.

वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता (विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन), व युवराज (रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी) विशेष उल्लेखनीय आहेत.

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
१८५७ची संग्राम गाथा अभिजित प्रकाशन
अरुण शोरी निवडक लेख अनुवादित अभिजित प्रकाशन
आज इथे : उद्या तिथे मेहता प्रकाशन
इंदिरा गांधींचे साथीदार ? प्रकाशन
ऑपरेशन थंडर अभिजित प्रकाशन
इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली अभिजित प्रकाशन
इंदिराजी आउवादित, मूळ लेखक भगवानदास अभिजित प्रकाशन
इन जेल अनुवादित (मूळ लेखक कुलदीप नायर) अभिजित प्रकाशन
इस्रायलचा वज्रप्रहार पद्मगंधा प्रकाशन
१९४७ अक्षरधारा प्रकाशन
१९४७ ते दुसरे महायुद्ध मॅजेस्टिक प्रकाशन
एडविना आणि नेहरू मेहता प्रकाशन
ऑपरेशन थंडर अभिजित प्रकाशन
कथा ही दिवावादळाची अनुवादित, मूळ लेखक अनंत सिंग मेहता प्रकाशन
गरुडझेप ऐतिहासिक अभिजित प्रकाशन
जय हिंद आजाद हिंद ऐतिहासिक कादंबरी मेहता प्रकाशन
तारका ? प्रकाशन
तीन युद्धकथा स्वाती प्रकाशन
द वर्ल्ड ऑफ कपिल देव अनुवादित अभिजित प्रकाशन
दुसरे महायुद्ध अभिजित प्रकाशन
नेताजी ऐतिहासिक मेहता प्रकाशन
पराजित-अपराजित मॅजेस्टिक प्रकाशन
फसलेला क्षण मेहता प्रकाशन
बंगलोर ते रायबरेली श्रीविद्या प्रकाशन
बासष्टचे गुन्हेगार कुलस्वामिनी प्रकाशन
भारत १९४७ पूर्वी ? प्रकाशन
भारत विकणे आहे अनुवादित मेहता प्रकाशन
मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य ? प्रकाशन
मारुती कारस्थान विश्वकर्मा प्रकाशन
युवराज नवचैतन्य प्रकाशन
रक्तरंगण केसरी प्रकाशन
राजमाता राजहंस प्रकाशन
राजो फरिया आणि सईद अनुवादित पद्मगंधा प्रकाशन
रायबरेली व त्यानंतर विद्या प्रकाशन
वज्रप्रहार अभिजित प्रकाशन
वॉर्सा ते हिरोशिमा मेहता प्रकाशन
वुइ दि नेशन अनुवाद मेहता प्रकाशन
वुइ दि पीपल अनुवाद मेहता प्रकाशन
व्होल्गा जेव्हा लाल होते अभिजित प्रकाशन
श्रीशिवराय इंडिया बुक कंपनी प्रकाशन
संग्राम राजहंस प्रकाशन
सत्तावन्न ते सत्तेचाळीस अभिजित प्रकाशन
सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकावृत्ती) अभिजित प्रकाशन
सातवे सोनेरी पान कुलस्वामिनी प्रकाशन
सावरकर ऐतिहासिक अभिजित प्रकाशन
स्टॅलिनची मुलगी अभिजित प्रकाशन
स्वातंत्र्यवीर सावरकर ऐतिहासिक नवचैतन्य प्रकाशन
स्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञात नवचैतन्य प्रकाशन
स्वेतलाना इनामदार बंधू प्रकाशन
हिटलर मॅजेस्टिक प्रकाशन
हे नेते ’जनता’चे ? प्रकाशन

वि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b उमदा लेखक, उमदा माणूस. p. १३६.
  2. ^ a b उमदा लेखक, उमदा माणूस. p. ४.
  3. ^ a b c उमदा लेखक, उमदा माणूस. p. १२ - २१.

बाह्य दुवे

संपादन