विठ्ठलराव विखे पाटील
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विठ्ठलराव विखे पाटील (१८९७-१९८०) यांचा जन्म लोणी बुद्रुक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली. ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना द्यावे लागेल. सहकाराच्या माध्यमातूनच समाजाचा ख-या अर्थाने विकास करता येईल. कृषी प्रधान असलेल्या भारतासारख्या देशाला सहकाराच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जाता येईल ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.[१] शेतक-यांना सुखासमाधानाने आपले जीवन जगता यावे. त्याच्या मालाला बाजार मूल्य प्राप्त करून् देता यावे, शेतक-यांचे हालअपेष्टा थांबावेत, त्यांना स्वाभिमानाने स्वयंपूर्ण् जीवन जगता यावे या उद्धेशाने १५ मे १०६२ या रोजी नगर जिल्यात लोणी या ठिकाणी देशातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना त्यावेळचे भारताचे पंतप्रधान नेहरु यांच्या शुभ हस्ते समारंभपुर्वक उद्घाटन करून सुरू केला. अनेक खडतर परिस्थितीतून हा कारखाना सहकारी तत्त्वावर उभा राहिला. अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं. याचं संपूर्ण श्रेय हे सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल. लोकांच्या हाताला काम तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देऊन त्यांची आर्थिक विवंचना थांबवण्याचे काम हे या सहकारामुळे शक्य झालं. आज संपूर्ण महाराष्ट्मध्ये अनेक सहकारी तत्त्वावरील उद्योग व्यवसाय उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान हे महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. पुढच्या काळामध्ये अनेक दूरदृष्टीचे नेते आणि सहकारमहर्षी या क्षेत्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अनेक सहकारी संस्था सहकारी तत्त्वावर उभ्या राहिल्या. दूध संघ, सहकारी बँका, को- ऑपरेटिव्ह सोसायटी, शेती संस्था, या प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. सहकारी कारखाने उभे राहिले. यातून ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांच्या विकासाला चालना मिळाली.[१] अनेक गावे समृद्ध झाली.
- ^ a b सावंत, शिवाजी (२००२). महारष्ट्राचे शिल्पकार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. मुंबई: महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. pp. १.
विठ्ठलराव विखे पाटील | |
---|---|
जन्म |
विठ्ठल १२ ऑगस्ट इ.स. १८९७ लोणी ता.श्रीरामपूर ब्रिटिशकालीन भारत |
मृत्यू |
२७ एप्रिल इ.स. १९८० लोणी ता.श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | ४ थी |
पेशा | समाजसेवा |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९२३- इ.स. १९८० |
प्रसिद्ध कामे | आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना |
मूळ गाव | लोणी बु |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म | हिंदू |
अपत्ये | बाळासाहेब विखे |
पुरस्कार | पद्मश्री (इ.स. १९६१), डी. लिट्.(इ.स. १९७८) |