विक्रमगड विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ - १२९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, विक्रमगड मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील १. विक्रमगड,२. जव्हार आणि ३. मोखाडा ही तालुके आणि ४. वाडा तालुक्यातील कांचड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. विक्रमगड हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल चंद्रकांत भुसारा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

विक्रमगड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ सुनिल चंद्रकांत भुसारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ विष्णु रामा सवरा भारतीय जनता पक्ष
२००९ चिंतामण वांगा भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".