विकिपीडिया चर्चा:दिनविशेष/जानेवारी १
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ याची अधिक माहीती तुम्हाला सुधाकर खांबे याच्या "शॊर्य आणि पराक्रमाचे प्रतीक" या पुस्त्कात मिळेल. जय भिम
भाषा वस्तुनिष्ठ असावी
संपादन'भीमा कोरेगाव' ('भिमा कोरेगाव' नव्हे) संदर्भातील मजकुराची भाषा वस्तुनिष्ठ राहावी. मजकुराच्या मांडणीत व्यक्तिगत मतांचे प्रभावी सावट पडू देऊ नये.
--संकल्प द्रविड 05:13, 18 जानेवारी 2007 (UTC)
इतिहास हा कधिच वैयक्तीक नसतो
संपादन'भीमा कोरेगाव' इतिहास हा कधिच वैयक्तीक नसतो आणि बघनारयाच्या दृष्टिकोनावर अवलंबुना आहे. मजकुरात व्यक्तिगत मतांचे सावट वाटत असल्यास ईतिहास बदलणार आहे का? तसे असल्यास मल ईतिहास बदला. . -जयभिम
जयभिम,
- इंटरनेट्वर बऱ्याच ठिकाणी या लढाईचे वर्णन मिळाले. तुम्ही लिहिल्यापैकी "भिमा कोरेगाव - १ जानेवारी १८१८ विजय दिन - या दिवशी ५०० महार सॆनिकांनी २५००० पेशवे सॆन्याचा पराभव केला. " हे खरे आहे पण हे लोक कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या हाताखालील बटालियन दुसरी/बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री या इंग्लिश सैन्याचा भाग होते आणि त्यांच्याबरोबर २ Madras Artillery 6pdrs and 300 auxiliary horse या छोट्या फलटणी होत्या. शिवाय या सैन्यात "थोडे" इतर जाती धर्माचे ही लोक होते. त्यामुळे हे काम इंग्लिश लोकांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासाठी लढण्यात आली हे स्पष्ट होते. त्यामुळे "हि लठाई पेशवे काळात त्याच्या वर झालेल्या अत्याच्याराचा बदला होता आणि अस्पृश्यतेच्या विरुध लढ्याचे पहिले पाऊल होत." हा दुसरा भाग काढून टाकावा असे मला वाटते. - कोल्हापुरी 05:42, 18 जानेवारी 2007 (UTC)
- काही संदर्भ:
- A History of British India, from the Earliest English Intercourse to the Present Time
- v.1. History of the Mahar Regiment through 1972 -- vBrigadier A.S. Adhikari, VSM. Published 1981Mahar Regimental Centre
- सिफीवरील संदर्भ
- पिंडारी कँपेन
- कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन
- history of 17th horse
आदरनीय कोल्हापुरी, मला वाईट वाट्त आहे की माझ्या लेखाला तुम्ही चुकीचा अर्थ देत आहात. कारण महार रेजिमेंट ईंग्रजांकडुन लढन्या पुर्वी पेशव्याना त्यांच्या बाजुने लढन्यास तयार असल्याचे म्हणाले होते. परंतु केवल द्वेषभावनेने पेशव्यानी ते नाकारले होते.
- आदरणीय जयभीम,
- परंतु केवल द्वेषभावनेने पेशव्यानी ते नाकारले होते.
- कृपया तुम्ही या गोष्टीचा संदर्भ द्या.
- --कोल्हापुरी 06:11, 18 जानेवारी 2007 (UTC)
- जयभिम,
- पेशव्यांनी द्वेषभावनेने नाकारले हे तुमचे म्हणणे पूर्वग्रहदूषित वाटते. कारण पेशव्यांचे सैन्य हे काही ब्राह्मण जातीपुरते सीमित नव्हते. मराठी समाजातल्या बर्याच जातीजमातीतून आलेल्या सैनिकांचा त्यात पूर्वीपासून समावेश होता. दुसरी गोष्ट म्हणजे पेशव्यांनी महार सैनिकांना आपल्या बाजूस सामील करून घेण्याचे नाकारले असे तुमचे म्हणणे धरून चालले, तरीही महार सैनिकांच्या अपमानाचा बदला घेण्यास त्यांना सहाय्य करावे असा हेतू इंग्रज नेतृत्त्वाचा असणे अशक्य वाटते. कॅप्टन स्टाँटन इतक्या माणुसकीच्या हेतूने ५०० महार सैनिकांचे नेतृत्व करून लढला असेल, तर त्याची वर्गवारी 'समाजसुधारक' अशीच करायला हवी अशी मागणी पुढे येऊ शकेल.
- सबब, या संदर्भातील माहिती वस्तुनिष्ठपणे मांडावी असे माझे अजूनही मत आहे.
- --संकल्प द्रविड 06:15, 18 जानेवारी 2007 (UTC)
मी असे कोठे लिहिले की महार सैनिकांच्या अपमानाचा बदला घेण्यास त्यांना सहाय्य करावे असा हेतू इंग्रज नेतृत्त्वाचा होता. मला म्हणायचे आहे की जर पेशव्यानी जर जराशी मानुसकी महार लोकांना दाखवली असतीतर निदान शिवाजींच्या महाराष्ट्रात इंग्रज यशस्वी झालेनसते. मी काही संपुर्ण पेशव्यांना वाईट म्हणत नाही. कारण दुसरे बाजीरावांनी महार सॆनिकांना दुरावले नाही. जयभिम
- जयभिम,
- जराशी मानुसकी महार लोकांना दाखवली असतीतर निदान शिवाजींच्या महाराष्ट्रात ....
- शिवाजी महाराजांच्या विरोधात लढणारेही मराठी/मराठा व अन्यजातीय (तत्कालीन महार सुद्धा) होतेच की! मग तुम्हाला असे म्हणायचे आहे का की महाराजांनीसुद्धा त्यांच्या(महार, इ.)बद्दल माणुसकी दाखवली नाही?
- महाराजांचा असा अपमान करण्यापूर्वी थोडासा विचार करावा ही विनंती.
- आपण वरील दोन्ही (कोल्हापुरी व संकल्पच्या) प्रश्नांना उत्तर द्यालच, त्याबरोबरच कृपया माझ्या प्रश्नाचेही उत्तर द्यावे.
- अभय नातू 16:54, 18 जानेवारी 2007 (UTC)
मी म्हणालो आहे शिवाजी महराजांन सारखी महारांन बद्दल पेशव्यांनी माणुस्की दाखली असती तर, तुम्ही लोक वाईट अर्थ घेत आहात. आणि कोल्हापुरीच्या प्रश्नाल मी उत्तर मी दिले आहे आणि माझे उत्तर तुम्हाल आहे. जर खरया ईतिहासाल येथे स्थान नसेल तर या पुढे येथे मी काहीच लिहीनार नाही. धिक्कार करतो अशा विकिपेडियाच. अशा विकिपेडियाचा आणि तुमच्या सारख्या लोकांचा जय भिम
- महाराजा,
- 'आमच्यासारख्या लोकांचा' धिक्कार करण्यापूर्वी जरा आपले लिहिणे, वागणे आणि बोलणे तपासून पहा.
- जगात कोठेही गेलात तरी तुमच्या या हम-बोले-सो-कायदा मनोवृत्तीने तुमचे नुकसानच होणार.
- आता संकल्पला अजूनही आशा आहे की तुमच्याकडून येथे योगदान दिले जाईल. मला नाही. माझ्या मते तुम्ही येथे येउन खोडसाळपणे लिहून एका अतिशय चांगल्या उपक्रमात खोडा घालत आहात आणि इतरांचा वेळ वाया घालवत आहात.
- पण तरी संकल्पचा (व इतरांचाही) आदर राखून मी तुमचा धिक्कार करीत नाही.
- शुभास्ते पंथान संतुः
- अभय नातू 17:31, 19 जानेवारी 2007 (UTC)
- >>>>मी असे कोठे लिहिले की महार सैनिकांच्या अपमानाचा बदला घेण्यास त्यांना सहाय्य करावे असा हेतू इंग्रज नेतृत्त्वाचा होता.<<<<
- बरोबर. तुम्ही असे म्हणाला नव्हता हे मला माहीत आहे. पण Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ आणि भीमा कोरेगाव या लेखात तुम्ही जेव्हा "१ जानेवारी १८१८ विजय दिन - या दिवशी ५०० महार सॆनिकांनी २५००० पेशवे सॆन्याचा पराभव केला. हि लठाई पेशवे काळात त्याच्या वर झालेल्या अत्याच्याराचा बदला होता आणि अस्पृश्यतेच्या विरुध लढ्याचे पहिले पाऊल होत." असे लिहिता तेव्हा त्यातून तुम्हाला महार सैनिकांच्या जोरावर इंग्रजांनी पेशव्यांच्या मराठी सैन्याचा पराभव केला या वस्तुनिष्ठ घटनेचे अनुचित उदात्तीकरण करायचे आहे असा अर्थ निघतो. एकतर इंग्रज-मराठा सत्तासंघर्षातल्या एका घटनेला तुम्ही "अत्याच्याराचा बदला" आणि "अस्पृश्यतेच्या विरुध लढ्याचे पहिले पाऊल" अशी विशेषणे जोडून उदात्त करू पाहताय.. त्या युद्धाला इंग्रज-मराठा संघर्षाऐवजी 'पेशव्यांनी केलेल्या अत्याचाराचा महार सैनिकांनी घेतलेला बदला' अशी भडक छटा देत आहात. आणि त्याहून कमाल म्हणजे इंग्रज सैन्याच्या मराठा सैन्यावरील विजयाचे "विजयदिन" म्हणून छुपे कौतुक करताय ह्या गोष्टीचा विषाद वाटतो (मी तुमच्याप्रमाणे 'धिक्कार करतो' वगैरे भाषा वापरत नाहीये हे लक्षात घ्या. कारण तुम्ही मराठीभाषिक म्हणून मराठी विकिपीडियावर अजूनही चांगले योगदान करू शकाल अशा आशेने, आस्थेने मी भडक, टोकाची भाषा वापरणार नाही.. मतभेद असले तरीही!).
- तात्पर्य, इतिहासातल्या घटनेला वतुनिष्ठ पद्धतीने मांडणे हे 'खरा इतिहास' मांडणे होय. केवळ पूर्वग्रहांना बळी पडून ऐतिहासिक घटनांचे विपर्यस्त लेखन करून 'खोटा इतिहास धुऊन खरा इतिहास लिहिण्याचे' कर्तव्य बजावल्याचे समर्थन करणे ही तुम्ही स्वतःशी आणि (मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून) इतर मराठी भाषिकांशी केलेली प्रतारणाच ठरेल.
- --संकल्प द्रविड 09:05, 19 जानेवारी 2007 (UTC)
नमस्कार जयभीम,
आपल्या भावना मी समजू शकतो. आपण या वादाचा चुकीचा अर्थ घेऊ नये.हा उपक्रम मराठी माणसांसाठी आहे. केवळ उच्च जातीवाल्यांसाठी आहे आणि ते लोक खरा इतिहास दाबून धरत आहेत असा समज करून घेऊ नका. आपण जर योग्य संदर्भ अथवा स्रोत आणलात तर ती माहिती समाविष्ट करता येईल. आपल्या पुर्वग्रहामुळे आपण कृपया इतरांचा धिक्कार करु नयेत तसेच आपण देखिल विकिपीडियात योगदान करत रहावे. येथे सर्व मराठी बांधवच आहेत. येथे ब्राम्हण, दलीत, हिंदू मुस्लिम असा भेद करु नये. पेशवे हे राज्यकर्ते होते. त्यांच्या हातून चुका घडल्याही असतील. पण केवळ ते ब्राम्हण असल्यामुळे तुम्ही त्यांच्या मनात अढी बाळगू नका.
जय भीम आणि जय महाराष्ट्र, →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 18:33, 19 जानेवारी 2007 (UTC)
pre world war II - British racism in defence recruitment
संपादनHere is one link en:Martial Race which shows how british mentallity also was racist in prior world war II - India. Mahitgar ११:४४, ३० जानेवारी २००७ (UTC)