विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या (अमराठी)
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Mahitgar
नावात बदल करण्याचे अधिकार प्रचालकांना आहेत काय? ते अधिकार जर त्यांना नसतील तर त्यांना विनंती कशासाठी करायची व ती विनंती त्यांना करण्यासाठी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या या पानाची गरजच काय?
-संतोष दहिवळ (चर्चा) २२:४४, २५ मे २०१२ (IST)
- >>नावात बदल करण्याचे अधिकार प्रचालकांना आहेत काय?
- प्रचालकांना नव्हे पण स्वीकृती अधिकारी उर्फ प्रशासक उर्फ ब्युरोक्रॅट पदाच्या अधिकार आणि कर्तव्याचा तो महत्वपूर्ण भाग आहे.
- >>ती विनंती त्यांना करण्यासाठी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या या पानाची गरजच काय?
- आता पर्यंत या विनंत्या व्यक्तिगत चर्चा पानांवर जात होत्या. प्रचालक/प्रशासक कर्तव्य जरी पार पाडत असले तरी, माझ्या व्यक्तिगत श्रद्धेनुसार प्रचालक/प्रशासक आपली कर्तव्ये समुदायाच्या सल्ल्यानुसार आणि विकिपीडियाच्या नितींना अनुसरून पार पाडतात त्यामुळे शक्य तेवढे शक्य तेव्हा समुदायाला सामावून घेण्याचा प्रयत्न असावा.शिवाय आजचे सदस्य उद्दाचे प्रचालक आजचे प्रचालक उद्दाचे स्वीकृती अधिकारी आणि मग पुढे वर असणार आहेत, त्यामुळॅ समुदाय/सदस्यांना सामावून घेणे चांगले .
- दुसरे असे की एक प्रचालक/प्रशासक व्यक्तिगत पातळीवर व्यस्त असून काही कारणानी व्यस्त असातील तर दुसऱ्या प्रचालक/प्रशासकांना सदस्यांच्या विनंत्यांची दखल घेता आली पाहिजे त्या करिता सेंट्रलाईज्ड चर्चा पान समन्वया करिता बरे पडते (आता सध्या मिळालेल्या विनंतीची अंमल बजावणी केली जाण्यात विलंब झाला आहे, तो तसा टाळणे सोपे जावे असा उद्देश आहे. ),प्रशासकीय कार्यात ट्रांसपरन्सी लेव्हल चांगली मेंटेन होऊ शकते.
- पानाचे नाव हेच असावे असा माझा ह्ट्ट नाही या पेक्षा अधीक चांगले नाव स्थळ सूचल्यास सुयोग्य सूचना/बदलांचे सहभागाचे स्वागत आहे. .माहितगार (चर्चा) २१:३४, ७ जून २०१२ (IST)