विकिपीडिया:विकिप्रकल्प इचलकरंजी
उद्दिष्ट
संपादनइचलकरंजी हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा असलेले सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे औद्योगिक शहर आहे. येथील सजग नागरिकांनी या शहराचा इतिहास, स्मारके, प्रमुख व्यक्ती व संस्था, वस्त्रोद्योग, भौगोलिक परिस्थिती, नद्यांचे वास्तव, संबंधित सामाजिक व सांस्कृतिक घटना यावर ज्ञान निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व प्रक्रियेत विविध प्रकारची कौशल्ये असणाऱ्या नागरिकांचा सहभाग असणार आहे. विकिपीडियात लेख, विकिमिडिया कॉमन्सवर फोटो तसेच साहित्य विकिस्रोतवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणासाठी सीआयएस या संस्थेचे सहकार्य लाभत आहे. या प्रकल्पाची प्राथमिक चर्चा करून आराखडा करण्यासाठी व पुढील कामासाठी खालील ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.
प्रशिक्षण
संपादन- १३ सप्टेंबर २०२०: प्रकल्पाची प्राथमिक चर्चा आणि आराखडा, वारसास्थळांची यादी तयार करण्यास सुरुवात, Wiki Loves Monuments अंतर्गत प्रशिक्षण