विकिपीडिया:लॉगआऊट करताना

आपण इंटरनेटवर (युनिकोडपद्धतीचे) मराठी टायपिंग करता का ? करत असाल तर आपल्या आवडत्या टायपिंग पद्धतीची कृपया या ऑनलाइन गूगल सादरीकरणात नोंद करा

आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास वरील गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध सर्व टायपिंग पद्धती पहा।

हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/1 आपल्याकडे जराशी सवड असल्यास आणि आपण अद्याप मराठी विकिपीडियाच सविस्तर परिचय करून देणार हे ऑनलाईन पॉवरपॉईंट प्रेझंटेशन पाहीले नसल्यास ते अवश्य पहावे.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/2 नमस्कार,

नव्याने उपलब्ध झालेली विकिपीडिया:यथादृश्यसंपादक (व्हिज्यूअलएडीटर) संपादन सुविधा आपण वापरून संपादन करून पाहीलेत का ?

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/3

  • TAT संकल्पनेवर आधारीत खालील चित्रीत कल्पित घटनेतील व्यक्ति कोण असेल? का धावत असेल ? तुमची कल्पना/काल्पनीक गोष्ट लिहा. वेगवेगळे लोक एकाच चित्रा बद्दल कसा वेगवेगळा विचार करतात अनुमान आणि निष्कर्ष काढतात ते वाचा.इतरांच्या अनुमानांबद्दल आपले विचार मांडा.
धावणाऱ्या व्यक्तीची सावली
    • एका घटनेत शेजारील चित्रा प्रमाणे क्षणभर एका धावणाऱ्या व्यक्तिची सावली दिसते.
    • चित्रीत कल्पित घटनेची पार्श्वभूमी काय असेल ? तुमची कल्पना लिहा.
    • या चित्रीत घटनेत सध्या काय होते आहे असे तुम्हाला वाटते ?
    • तुमच्या कल्पीत घटनेतील संबधीत पात्रे काय अनुभवत अथवा विचार करत असतील ?
    • तुमच्या कल्पने प्रमाणे या गोष्टीचा आऊटकम/शेवट काय असेल ?
    • लिहिणे झाल्या नंतर खाली जतन करा वर टिचकी मारा.
    • ह्या निमीत्ताने होणारी चर्चा (एक्सरसाईज) मराठी विकिपीडियातील काही सहाय्य पानांमध्ये संदर्भाकरिता वापरला जाण्याची शक्यता आहे. आपल्या सहभागाकरिता धन्यवाद.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/4 मराठी विकिपीडिया तांत्रिक सुधारणा आवश्यकता गूगल ऑनलाईन सादरीकरण , यात आपण पण सहभागी होऊ शकता.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/5

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/6 मराठी विकिपीडियाच्या आता पर्यंतच्या प्रगतीचा गूगल ऑनलाईन आढावा ह्या सादरीकरणाचे अद्ययावतीकरणात सहभागी व्हा अथवा त्याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे चर्चा करा.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/7

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/8

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/9

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/10

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/11

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/12 विकिपीडिया मुल्यव्यवस्थेचे आकलन; विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा; एक गूगल ऑनलाईन सादरीकरण , यात आपण पण सहभागी होऊ शकता.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/13

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/14 आपल्यात संगोपनातून आणि संस्कृतीतून आपल्या विचारसरणीत अंगिकारले गेलेले कल(बायस) लक्षात घेऊन ते कमीत कमी करण्यासाठी, आपल्यात, विचार करण्यात अधिक चांगला असण्याची इच्छा आणि इच्छाशक्ती असणे आवश्यक असते.

मनात बाळगलेले पुर्वापार विश्वास नाकारले जाणार असतील, तरी त्याची तयारी ठेवत, वस्तुस्थितीशी मेळ खाणारे पुरावे आणि ज्ञान मिळवणे, आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्याची तयारी असली पाहीजे.वस्तुस्थितीशी मेळ खाणार्‍या पुराव्यांनी आणि ज्ञानाने, आपले विश्वास निराधार असल्याचे सिद्ध केले तर, वस्तुस्थितीतील फरक स्विकारणे हीच योग्य प्रतिक्रीया ठरते.-क्रिटीकल थिंकींग हे युट्यूब सादरीकरण पहा (इंग्रजी) अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)

  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/15 चिकित्सामक विचार (क्रिटिकल थिंकींग) शंकेखोरपणा स्विकारते, असा शंकेखोरपणा म्हणजे संकल्पनांना स्वैरपणे लाथाडणे नव्हे, तर आपण ज्या दाव्यांचं प्रतिनिधीत्व करतो त्या बाबत निरसन होई पर्यंत निर्णयास स्थगिती देण्याची तयारी, जेणे करून सुयोग्य नसलेले दावे आपण जसेच्या तसे स्विकारणार नाही तर त्यांना समजून घेण्यास वेळ देणे, त्यामागचे कार्यकारण, गृहीततत्वे कल (बायसेस) पडताळणे.कार्यकारण हे सुस्पष्ट साधार सुसंगत तर्कावर आधारीत हवे, न की भावना अथवा सामाजीक दडपणाने प्रभावीत झालेले.कारण, वस्तुनिष्ठ दाव्यांची सत्यता, त्याच्याशी निगडीत भावनांनी अथवा एखादा समूह विश्वास ठेवतो म्हणून ठरत नाही.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)

  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/16

काळा आणि पांढरा, आयुष्यात केवळ दोनच रंग?

जटील समस्या सोडवण्यातील मोठ्या अडथळ्यातील एक म्हणजे, समस्यांकडे केवळ काळ्या किंवा पांढर्‍या या दोन रंगांशिवाय पहाण्याची तयारी नसणे. असे लोक अधिक पर्याय उपलब्ध असतांना देखील त्यातील खरे तर आपल्याला हवा असलेला एकच पर्याय पाहू इच्छितात. दुसरा पर्यायाचा एकच गट केलेला असतो तो म्हणजे अस्विकार्ह पर्यायांचा .हे उपलब्ध पर्यांयांना चुकीच्या पद्धतीने दुभागणे असते.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)

  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/17

काळा आणि पांढरा, आयुष्यात केवळ दोनच रंग?

चुकीच्या दुभाजनाची निष्पत्ती चुकीच्या निष्कर्षात होते. 'जर पर्याय 'अ' चुकीचा असेल तर पर्याय 'ब' बरोबर असलाच पाहीजे.' ;एखाद्याचा दृष्टीकोण 'क्ष' नसेल तर तो 'ज्ञ' असलाच पाहीजे.
केवळ काळ्या किंवा पांढर्‍या दोनच रंगांशिवाय इतर पर्याय विचारात घेण्याबद्दल अनिच्छा अथवा नकारार्थी दृष्टीकोणामागे बहूधा, समस्येस निश्चित एकमेव उत्तरांचा अभाव, आणि समस्येतून उद्भवणारी अनिश्चित संदीग्ध स्थिती हाताळण्यातील अक्षमता, ही संभाव्य कारणे असतात.एखादी गोष्ट स्पष्ट अथवा माहित नसण्यातून, येणारी संदीग्धता अथवा अनिश्चितीते बद्दल असंयम, (उणीवयुक्त) निष्कर्शाप्रत पोहोचण्याची घाई, हि सत्याप्रती असलेल्या उत्सुकतेचा भाग नसून, कम्फर्ट हवी असल्याने हा उताविळपणा घडतो.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)

  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/18 चिकित्सामक विचारकर्त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे ते अनिश्चितता हाताळू शकतात.चिकित्सामक विचारकर्ता, आपल्याला कोणत्या भागाबद्दल 'काय माहित नाही', हे माहित करून घेण्यास प्राधान्य देतो.चिकित्सामक विचारकर्ते ग्राह्य पुराव्यांकरता आणि ग्राह्य पुराव्यांवर आधारीत उत्तराची वाट पहाण्याची तयारी ठेवतात.चिकित्सामक विचारकर्ते जिज्ञासूपणा,दृष्टीकोण व्यापक करण्याची आणि आपल्या ज्ञानाचा परीघ विस्तारण्याची उत्कंठा जोपासतात.संबंधीत विषयाबद्दल योग्य माहिती करून घेण्याच्या दिशेने कार्यरत असतात.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)

  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/19

काळा आणि पांढरा, आयुष्यात केवळ दोनच रंग?

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
चुकीचे कारण सांगण्यातील घाई चुकीच्या अर्थबोधास कारणीभूत होण्याची शक्यता असते. वरवरचे धागे जुळवून शितावरून भात म्हणत, सुतावरून स्वर्ग गाठला जाऊ शकतो, आणि साप साप म्हणून भुई थोपटली जाऊ शकते.
ज्यात वैध शक्यता अंतर्भूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा पर्यायी कारण मीमांसा, सर्व शक्यता पुरेसा अवधी न दिला जाताच बाद केल्या जातात. ग्राह्य शक्यता कोणत्या आहेत ते सुस्पष्ट होण्यापूर्वीच, त्यांची शक्यता नाकारणे म्हणजेच मनाला चारी बाजूने झापडे लावून बंद करणे अथवा क्लोज माइंडेड असणे होय.

  • 'क्ष' गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसणे, हा 'ज्ञ' गोष्ट बरोबर असल्याचा पुरावा नसतो. -हा विरोधाभास एक तार्किक उणीवेचा प्रकार आहे.
    • माझ्याकडे क्ष गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नाही = माझ्याकडे कारण मीमांसा उपलब्ध आहे,हे दोन्ही परस्पर विरोधी दावे एकदम केल्यासारखे आहे.
  • "ज्या गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसते" ="त्याची कारण मीमांसा उपलब्ध नसते" एवढे आणि एवढेच त्या पलीकडे काही नाही.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/20

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/21 जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी 'क्ष' गोष्टीवर विश्वास नाही म्हणजे त्याला 'क्ष' सत्य असूच शकत नाही असे म्हणायचे असते असे नाही; क्ष सत्य असूच शकत नाही म्हणत असेल तर तो झाला क्लोज माइंडेडनेस; पण विश्वास नाही पण तर्कसुसंगत पुरावे आल्यास विश्वास ठेवेन हा झाला मनाचा खुलेपणा (ओपन माइंडेडनेस).

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/22 माझ्या अनुभवाची, मी कारण मिमांसा देऊ शकत नाही, म्हणून माझा श्रोताही माझ्या अनुभवाची कारण मिमांसा देण्यात अपात्र आहे, म्हणून माझा अनुभव आणि मी स्वत:च केलेला कयास बरोबर आहे, ही एक तार्कीक उणीव असते आणि अयोग्य असते; कारण त्रयस्थ व्यक्तीस संबधीत गोष्ट स्वतंत्रपणे पडताळण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध नसते.त्रयस्थ व्यक्ती तुम्ही गाळलेले अथवा तुमच्या अनवधानाने गळालेले मुद्दे आणि विवरण स्वतंत्रपणे तपासू शकत नाही.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/23

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/24

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/25

  • " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
  • " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
  • "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
  • "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
  • "सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"

उपरोक्त मांडलेली उदाहरणे व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाची आहेत.

मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते.

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/26 विकिपीडिया:लॉगआऊट करताना/26

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/27 विकिपीडिया:लॉगआऊट करताना/27

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/28 विकिपीडिया:लॉगआऊट करताना/28

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/29 विकिपीडिया:लॉगआऊट करताना/29

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/30 विकिपीडिया:लॉगआऊट करताना/30