विकिपीडिया:लॉगआऊट करताना/15
चिकित्सामक विचार (क्रिटिकल थिंकींग) शंकेखोरपणा स्विकारते, असा शंकेखोरपणा म्हणजे संकल्पनांना स्वैरपणे लाथाडणे नव्हे, तर आपण ज्या दाव्यांचं प्रतिनिधीत्व करतो त्या बाबत निरसन होई पर्यंत निर्णयास स्थगिती देण्याची तयारी, जेणे करून सुयोग्य नसलेले दावे आपण जसेच्या तसे स्विकारणार नाही तर त्यांना समजून घेण्यास वेळ देणे, त्यामागचे कार्यकारण, गृहीततत्वे कल (बायसेस) पडताळणे.कार्यकारण हे सुस्पष्ट साधार सुसंगत तर्कावर आधारीत हवे, न की भावना अथवा सामाजीक दडपणाने प्रभावीत झालेले.कारण, वस्तुनिष्ठ दाव्यांची सत्यता, त्याच्याशी निगडीत भावनांनी अथवा एखादा समूह विश्वास ठेवतो म्हणून ठरत नाही.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)
- विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.