विकिपीडिया:लॉगआऊट करताना/19
जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
चुकीचे कारण सांगण्यातील घाई चुकीच्या अर्थबोधास कारणीभूत होण्याची शक्यता असते. वरवरचे धागे जुळवून शितावरून भात म्हणत, सुतावरून स्वर्ग गाठला जाऊ शकतो, आणि साप साप म्हणून भुई थोपटली जाऊ शकते.
ज्यात वैध शक्यता अंतर्भूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा पर्यायी कारण मीमांसा, सर्व शक्यता पुरेसा अवधी न दिला जाताच बाद केल्या जातात. ग्राह्य शक्यता कोणत्या आहेत ते सुस्पष्ट होण्यापूर्वीच, त्यांची शक्यता नाकारणे म्हणजेच मनाला चारी बाजूने झापडे लावून बंद करणे अथवा क्लोज माइंडेड असणे होय.
- 'क्ष' गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसणे, हा 'ज्ञ' गोष्ट बरोबर असल्याचा पुरावा नसतो. -हा विरोधाभास एक तार्किक उणीवेचा प्रकार आहे.
- माझ्याकडे क्ष गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नाही = माझ्याकडे कारण मीमांसा उपलब्ध आहे,हे दोन्ही परस्पर विरोधी दावे एकदम केल्यासारखे आहे.
- "ज्या गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसते" ="त्याची कारण मीमांसा उपलब्ध नसते" एवढे आणि एवढेच त्या पलीकडे काही नाही.
- मनाचा खुलेपणा (इंग्रजी) हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)
- विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवरअवलंबून आहे. तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात. विकिपीडिया अधिकाधिक तर्कसुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.