विकिपीडिया:मासिक सदर/मे २००७

Crystal Clear action bookmark.png
ICC Cricket World Cup 2007 logo.png

इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणार्‍या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात आला. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीक होता. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला.


अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरूवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीतील आठपैकी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, Flag of New Zealand.svg न्यू झीलँड, Flag of Sri Lanka.svg श्रीलंकाFlag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका हे चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामन्यांत लढले. अंतिम सामना श्रीलंका व ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करीत सलग तिसर्‍यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला व जागतिक क्रिकेटमधले आपले वर्चस्व पुनः एकदा सिद्ध केले.

पुढे वाचा...