विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१२

हुसेनसागर तलाव

हैदराबाद Hyderabad.ogg उच्चार ऐका तेलुगू: హైదరాబాదు , उर्दू: حیدر آباد हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैदराबादची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे. मोत्यांचे शहर अशी एकेकाळी ओळख असलेल्या या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा लाभला आहे. १९९० नंतर शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ शहरात झाली. दक्षिण मध्य भारतातील पर्यटन आणि तेलुगू चित्रपटनिर्मितीचे हैदराबाद हे केंद्र आहे.

इतिहास: इ. स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गौलकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुलीकुतुब शाह याने गौलकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ. स.१५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात चारमीनार या वास्तूची उभारणी केली. गौलकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले. इ. स. १६८७ मध्ये मोगल सम्राट औरंगजेबने हैदराबाद ताब्यात घेतले, इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेल्या मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स.१९४८ पर्यंत हैदराबादचे निजाम म्हणून राज्य केले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी दंतकथांना जन्म दिला.

पुढे वाचा... हैदराबाद