विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा, ज्ञान प्रबोधिनी, पुणे
विकिपीडिया : मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा-ज्ञान प्रबोधिनी, पुणे
पार्श्वभूमी
संपादनजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विकीपिदिता आयोजित महिला संपादनेथोन उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मराठी विकिपीडिया गटामध्ये एकूणातच महिला संपादकांची संख्या अत्यल्प असल्याणे महिला संपादकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू होता.
स्वरूप
संपादनया कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. मराठी विकिपिडीयाच्या संपादिका आर्या जोशी यांनी या कार्शालेचे आयोजन केले आणि प्रशिक्षणही दिले. ‘विकिपीडियामधील महिलांचा सहभाग’ या विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ टोरॅन्टो (कॅनडा) येथे अभ्यास करणारी मूळची तैवान येथील टिंग यि चँग ही विद्यार्थिनी या कार्यशाळेला आली होती.
साधन व्यक्ती
संपादन- संयोजक (ज्ञान प्रबोधिनी) - आर्या जोशी
- तज्ञ मार्गदर्शक (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - ॲक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)) - सुबोध कुलकर्णी
सहभागी सदस्या
संपादनएकूण पाच- १. माधुरी करवडे २. चंदा पागे ३. प्रीती जोशी ४. मनिषा देशपांडे ५. सुनीता गायकवाड
प्रशिक्षणाचे मुद्दे
संपादनविकिपीडिया प्रकल्पाची ओळख मराठी विकिपीडियाचे स्वरूप समजावून घेणे प्रत्येक सदस्याचे खाते उघडणे स्त्रीविषयक विविध लेख शोधणे नवीन लेख संपादित करणे( प्राचीन भारतीय स्त्रिया, स्त्री संत अशा विषयांवर)
दिनांक स्थान व वेळ
संपादनगुरुवार दिनांक ९ मार्च २०१७
संस्कृत संस्कृती संशोधिका ज्ञान प्रबोधिनी, पुणे
वेळ-सकाळी ११ ते २
प्रशिक्षणात नव्याने आलेले मुद्दे
संपादनदोन सदस्यांनी त्यांच्या चलभाषवर संपादनाचा अनुभव घेतला. संगणकावर विकिपीडियाचे जे दृश्य स्वरूप दिसते त्यापेक्षा चलभाषवर ते थोडे वेगळे दिसते त्यामुळे नव्याने गोष्टी समजावून घेणे असा भाग प्रारंभी झाला. नव्याने एखादा लेख सुरु करायचा असेल तर त्यासाठी जुन्या एखाद्या संदर्भ लेखात ती संकल्पना संपादित करून मग त्या आधारे नव्या लेखाची सुरुवात करावी लागते अशाही स्वरूपाचे प्रशिक्षण या कार्यशाळेत समजावून द्यावे लागले.
संपादित लेख
संपादनरुद्राणी (देवता)
प्रियदर्शिनी कर्वे इंद्राणी (देवता) वेणाबाई कान्होपात्रा