विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३५
भारतातील विद्यापीठांची यादी - एक लेख वगळावा
संपादनसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ:अमरावती विद्यापीठ अशा देन नावानी एकाच विद्यापीठाची नोंद भारतातील विद्यापीठांची यादी मध्ये घेतलीली दिसते, तसेच संबंधित नोंदीचे दुवेपण दिले असून त्यांचे लेखपण आहेत. यातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या नावाचा लेख विकसित करावा व अमरावती विद्यापीठ ह्या नावाचा लेख वगळावा असे वाटते.
राहुल देशमुख ०४:४४, ४ जून २०११ (UTC)
या उलट, अमरावती विद्यापीठ या नावाचा लेख ठेवावा आणि लेखात संत गाडगेबाबा(एक शब्द)विद्यापीठ हा दुवा ठेवावा. असेच कोल्हापूर आणि अन्य विद्यापीठांचे करावे. शीर्षक नाव कोल्हापूर(किंवा जे गावाचे नाव असेल ते)ठेवून लेखात व्यक्तिनावाचा दुवा ठेवावा. एकाच शहरात दोन विद्यापीठे असतील तर आधी शहराचे नाव देऊन मग त्या शहरातील विद्यापीठांचे दुवे द्यावेत. उदा० शीर्षक: पुणे शहरातील विद्यापीठे (१) पुणे विद्यापीठ (२) टिळक विद्यापीठ(टिळक संस्कृत विद्यापीठ) (३) डीवाय पाटील विद्यापीठ वगैरे. विद्यापीठाला व्यक्तिपूजेप्रीत्यर्थ दिलेल्या नावांपेक्षा शहराचे नाव देण्याने लेख सापडायला मदत होईल. व्यक्तिनावे कदाचित उद्या बदलतील, पण शहराची नावे बदलण्याची शक्यता त्या मानाने कमी. ...59.95.3.28 ०७:५९, ६ जून २०११ (UTC)
सर्व साधारणतः विद्यापीठे हि त्यांचा नावानीच ओळखली जातात, जर विद्यापीठास गावाचे नाव दिलेले असेल तर ते त्यानावानेच प्रसिद्ध आहेत (उदा. दिल्ली विश्वविद्यापीठ) परंतु जर विद्यापीठास स्वतंत्र नाव आहे किवा नामांतर झाले असेल तर त्यास गावाच्या नावाने संबोधने योग्य नाही कारण एकाच गावात अनेक विद्यापीठे असू शकतात तसेच काही विद्यापीठे नावानी प्रसिद्ध आहेत परंतु त्यांची गावे मात्र त्या प्रमाणात प्रसिद्ध नाहीत (उदा. डॉ.बाबासाहेब अंबेडकर तंत्र विद्यापीठ लोनेरे ) लोनेरे, हे अतिशय छोटे गाव आहे (ग्रामपंचायत) पण बाटू हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तंत्र विद्यापीठ आहे. ह्या ठिकाणी भारतातील विद्यापीठांची यादी संकलित केली आहे त्यामुळे भारतातील विद्यापीठांच्या गावांची यादी देणे योग्य ठरणार नाही. आपण तशा माहितीसाठी एक वेगळा वर्ग तयार करून गावानरूप पण माहिती देऊ शकतो. तेव्हा येथे विद्यापीठाचे नावच भारतातील विद्यापीठांच्या यादीत असावे असे वाटते.
राहुल देशमुख ०५:१६, ८ जून २०११ (UTC)
केंदीय अन्वेषण विभाग शीर्षकात बदल
संपादनकेंदीय अन्वेषण विभाग शीर्षकात बदल करता येईल काय? त्या बद्दल काय करणे आवश्यक आहे?
Dr.sachin23 १७:१७, ५ जून २०११ (UTC)
बरोबर तारीख कोणती ?
संपादन- शाहू महाराज लेखात त्यांची जन्म तारीख २६जुलै दिली आहे तर दिनविशेष सदरात ती २६ जून माहितगार ०५:५०, २५ जून २०११ (UTC)
- कालनिर्णय दिनदर्शिकेत सन २००९,२०१० व २०११ या तिन्ही आवृत्यात २६ जुनच दिली आहे.सबब तीच बरोबर वाटते.
वि. नरसीकर (चर्चा) ०९:१९, २६ जून २०११ (UTC)
राजपिपळा आणि देडियापाडा
संपादनमराठीत उपान्त्यपूर्व अक्षर र्हस्व असते, आणि म्हणून राजपिपळातला पि मराठीत र्हस्व. तसेच देडियापाडाकरिता, डि र्हस्व. मराठीत ट-ठ-ड-ढ यांतली एकापेक्षा अधिक अक्षरे एका (सामासिक नसलेल्या) शब्दात येत नाहीत. त्यामुळे ताट, थेट, दौंड, दाट, ताठ, देठ, दाढ, थोडा, धाड या शब्दांप्रमाणे डेडिया नसल्यामुळे त्या गावाला देडिया करणे भाग आहे. मराठीत देडियापाडा हेच नाव प्रचलित आहे. गुजराथीत हे दोन्ही नियम नाहीत, त्यांनी कसेही लिहावे.....J १७:१८, १ जुलै २०११ (UTC)
डेडियापाडा प्रचलित?
संपादनमराठीत देडियापाडा हेच नाव प्रचलित आहे.
डेडियापाडा हे गाव वडोदरा, नर्मदा, भरुच जिल्ह्यांबाहेर कोणास माहितीही असेल याबद्दल मला शंका होती, ती फिटली :-) डेडियापाडातील मंडळी धन्य झालो म्हणतील...
पुन्हा एकदा आपण कोणाच्यातरी नावाच्या आपल्या सोयी (आणि आपल्याच नियमांनुसार) चिंध्या करीत आहोत.
गुजराथीत हे दोन्ही नियम नाहीत, त्यांनी कसेही लिहावे
ही गुजराथी भाषा कोणती? मराठ्ठा किंवा मरहट्टा भाषेच्या जवळपासची असावी....
अभय नातू १७:२७, १ जुलै २०११ (UTC)
- पश्चिम महाराष्ट्र, गुजराथ, सिंध आणि उत्तर कर्नाटक यांनी मिळून झालेल्या मुंबई इलाख्याचा मराठी नकाशा माझ्याकडे होता. त्यांत माझ्या आठवणीप्रमाणे देडियापाडा हे गाव होते. हे गाव अप्रसिद्ध नाही. देडिया हे आडनावही आहे. गुजराथ आणि मध्य प्रदेशातल्या एकूणएक शहरांमध्ये आणि किमान दोन-तीनशे खेड्यांमधून राहण्याची संधी एके काळी माझ्या नोकरीमुळे मला मिळाली होती. त्यामुळे या प्रांतातले जवळजवळ कुठलेही मोठे गाव मला अपरिचित नाही. हे दोन्ही प्रांत महाराष्ट्राचे शेजारी आहेत. शेजार्याची किमान एवढी माहिती प्रत्येकाला असते....J १८:०२, १ जुलै २०११ (UTC)
गौरव हा काय प्रकार असतो....?
संपादनमी कोणी तरी सदस्याच्या सदस्य पानावर गौरव हा शब्द आढळला,
- गौरव हा काय प्रकार असतो....?
असे तर नाहीना की शासनाने जसे काही गौरव करणे विसरत चालले आहेत, तसे नवीन लोकांकरता गौरव हा प्रकार बंद झाला की काय? की जुनी/जाणकार मंडळी अथवा प्रचालक/प्रशासक ही विसरत चालली आहेत. एखाद्या स्पर्धेत उत्तेजनार्थ की होईना बक्षिसे दिली जातात, त्याचा हेतू एक असतो की कार्य करणार्या लोकांना थोडासा तरी उत्साह निर्माण होतो असे मला वाटते. माझे मत चुकीचे ही असू शकते. विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प आहे, परंतु या 'गौरव' मधून तोटा होईल असे मला वाटत नाही. उलट सदस्य उत्साहाने काम करतील.
- असे समजू नका की मी असूसलेला आहे....
सचिन १७:०६, १० जुलै २०११ (UTC)
गौरव
संपादनसचिन,
मध्यंतरी गौरव (बार्नस्टार) देण्यासाठी काही पाने व संचिका, इ तयार केल्या गेल्या होत्या. मराठी विकिपीडियावरील अनेक प्रयत्नांप्रमाणे दोन-तीन सदस्य वगळता इतरांनी त्याबद्दल उदासीनताच दाखवली. विकिपीडिया:बार्नस्टार हे पान पाहिल्यास कल्पना येईल. इतर हजारो कामे पडली असता त्याकडे सहसा दुर्लक्ष झाले. सगळ्यांनाच आठवण करुन देण्याबद्दल धन्यवाद.
असे गौरव हे प्रचालकांनीच देणे अपेक्षित नाही. कोणीही कोणाचाही गौरव करू शकतो. अर्थात प्रत्येकाला प्रत्येक कृतीसाठी गौरव केलाच पाहिजे असे नाही.
अभय नातू १८:५८, १० जुलै २०११ (UTC)
- सध्या आम्ही सारेच जुने लोक पुरेसा वेळ देऊ शकत नाही आहोत हे वास्तव आहे.आहे तो वेळ किमान स्वरूपाच्या कामावर खर्च करतो आहोत. गौरव हे प्रचालकांनीच देणे अपेक्षित नाही. कोणीही कोणाचाही गौरव करू शकतो हे अभयचे म्हणणे बरोबर आहे. तुम्ही आसुसलेले आहात असा कुणीहि अर्थ घेणार नाही गौरव करणे चांगली गोष्ट आहे.शुभस्य शीघ्रम गौरवाची आपेक्षा न करता इतरांचा गौरव करणे चालू करावे ही शुभेच्छा माहितगार २२:०६, १० जुलै २०११ (UTC)
मंडळी कृपया विक्शनरी चावडीवर भेट देऊन...
संपादनमंडळी संकल्प सांगकाम्याकरिता मराठी विक्शनरी चावडीवर बॉट फ्लॅग विनंती आलेली आहे,तीथे मराठी विकिपीडियावर अभय नातूंकडे प्रशासक पद आहे तसे मराठी विक्शनरीवर उपलब्ध नाही.त्यामुळे सर्व मराठी विकिसदस्य मंडळींना विक्शनरी चावडीवर भेट देऊन देऊन संकल्प सांगकाम्यास समर्थन नोंद्वण्याची सादर आग्रहाची विनंती आहे.कृपया समर्थन Support या इंग्रजी शब्दाने नोंदवावे कारण मेटावरील स्टूअर्डना हे कळवले जाईल त्यांना मराठी भाषा येत असणार नाही.
पलसधारी
संपादनमुंबई के पास एक स्थान है पलसधारी,पर मैं इसके नाम को लेकर असमंजस की स्थिति में हूँ, यह पलसधारी है या पलासधारी, कृपया मार्गदर्शन करें.Dinesh smita १२:०९, १९ जुलै २०११ (UTC)
पळसदरी
संपादनमुंबई-पुणे दरम्यान येणार्या बोरघाटातले त्या रेल्वे स्टेशनचे नाव पळसदरी आहे. --J १२:३६, १९ जुलै २०११ (UTC)
ब्लॉक केलेल्या खातेपानावर लिहिता येते?
संपादनसंजना 2704 या त्यांच्या ब्लॉक केलेल्या खात्याच्या चर्चापानावर अजूनही असंबद्ध मजकूर लिहीत आहेत....J १२:३६, १९ जुलै २०११ (UTC)
- त्यांचे स्वतःचे चर्चा पान ब्लॉक केले नाही आहे पण बाकी संपादनांकरीत एक महीन्याचा प्रतिबंध घातला आहे माहितगार १५:१०, १९ जुलै २०११ (UTC)
पानाची लांबी
संपादनहे पान आता विविध चर्चांमुळे भलेमोठे झालेले आहे. यातील संपलेल्या चर्चा आणि नोंदी अडगळीच्या खोलीत रवाना कराव्या.
अभय नातू १८:०२, ३१ जुलै २०११ (UTC)
मी कालपासून कोहिमाची लढाई हा लेख लिहिण्यास घेतला आहे. काम संपत आले आहे तरी त्यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. त्यातील शुद्धलेखन, व्याकरण, माहितीचा बाज, इ. मध्ये योग्य ते बदलही करा.
अभय नातू २०:३४, १३ जुलै २०११ (UTC)