विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २८

प्रचालक होण्यासाठी अर्ज / कौल

संपादन

नमस्कार, मी गेल्या काही दिवसांपासून मराठी विकिपीडियासह मराठी विकिक्वोट मध्येही लिखाणास सुरूवात केली आहे. मी आतापर्यंत मराठी विकिपीडिया येथे १५३१ संपादने आणि मराठी विकिक्वोट येथे ७० संपादने केलेली आहेत. मराठी विकिक्वोट येथे प्रचालक म्हणून काम करण्यास मी उत्सुक असून त्याप्रमाणे मी q:Wikiquote चर्चा:Administrators येथे अर्ज माझा अर्ज सादर केला आहे. मराठी विकिपीडिया वरील सर्वांना मी विनंती करतो की, याबाबत तुमच्या प्रतिक्रिया q:Wikiquote:कौल येथे कळवाव्यात. सगळ्यांच्या मतांचे स्वागत आहे. Gypsypkd ०५:५८, २४ जून २०१० (UTC)

अभ्यवेक्षण कि सेंसॉरशीप

संपादन
परिभाषा कोशातील परिभाषिक शब्दांचा शोध मनोगत कृपेने आंतरजालावर आता थोडा सुसह्य झाला आहे, त्याचा उपयोग करून मी मराठी विकिपीडियावर आणि विकिक्वोटवर सेन्सॉरशिप एवजी अगदीच अप्रचलित अभ्यवेक्षण शब्द वापरला. खरे तर अभ्यवेक्षण हा शब्द मलाही भाषेत वापरण्याच्या दृष्टीने क्लिष्ट वाटतो आहे. गूगलवर शोध घेतलातर लोकसत्तातील एका अपवादात्मक बातमीशिवाय इतर कुठेही वापरलेला आढळत नाही.
कोणते वापरावे ?माहितगार ०८:१३, २८ जून २०१० (UTC)

अभ्यवेक्षण हाच शब्द ठेवावा. रुळण्यास वेळ लागेल पण तो मराठी आहे हे ही नसे थोडके. असे अनेक शब्द योजवयास हवे. हळूहळू ते रुळतील. सेन्सॉरशिप हा शब्द अनेक वेळा कानावर पडल्याने तो सोपा वाटतो हे एक कारण आहे. अभ्यवेक्षण ची पण कालांतराने सवय पडेल. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४२, २८ जून २०१० (UTC)

  • वरील मताशी सहमत, मराठी शब्दही रुळतील, सवय होईल. Gypsypkd ११:४१, २८ जून २०१० (UTC)
अभ्यवेक्षण अशा क्लिष्ट, भारदस्त शब्दाऐवजी दुसरा मराठी शब्द योजता येणार नाही का?
मुस्कटदाबी, काटछाट, मल्लीनाथी हे काही शब्द वानगीदाखल.
अभय नातू १५:२८, २८ जून २०१० (UTC)

परिनिरीक्षण

संपादन

चित्रपट-नाटकांच्या सेन्सॉरसाठी परिनिरीक्षण(करणे) आणि सेन्सॉरबोर्डासाठी परिनिरीक्षण मंडळ हे दोन्ही शब्द नेहमीच्या वाचनातले आहेत. गूगलवर शोध घेऊन खात्री करून घेतली आहे. सेन्सॉरशिपकरिता परिनिरीक्षण हे नाम वापरायला काहीही हरकत नाही. अभक्ष्यवेक्षण हा शब्द कधीही रूढ होणार नाही. --J १८:०९, २८ जून २०१० (UTC)

हो असे दिसते खरे, पण परिनिरीक्षण हा पारिभाषिकशब्द तयार करताना Peer review या अर्थाने आधी हिंदी संघशासकीय कामात आला आणि तो महाराष्ट्रीयनांनी उचलला असे दिसते या अभ्यवेक्षणची व्यूत्पत्ती माहित नाही पण अर्थछटेत सूक्ष्मभेद असावा असे वाटते. censor या शब्दाची Etymology From Latin cēnsor < censere (“‘to tax, assess, value, judge, consider, etc.’”).

तरीसुद्धा परिनिरीक्षण हा रूळण्यासारखावाटत असल्यामुळे परिनिरीक्षण शब्द निवडावा असे माझेही मत होत आहे.any openions ? माहितगार १५:५६, ३० जून २०१० (UTC)

अवर्गीकृत पाने

संपादन

मराठी विकितील अनेक लेख अवर्गीकृत अवस्थेत आढळतात. आता मराठी विकित जुने झालेले सदस्यही (केवळ आपली संपादन संख्या वाढवत) नवीन लेख (नुसते पान) तयार करून त्या लेखात काहीही माहिती लिहीत नाही. अशा लेखांना योग्य वर्गात कसे टाकावे? Gypsypkd ११:४१, २८ जून २०१० (UTC)

१. अशा सदस्यांना (हलकेच) वर्गीकरण आणि एक तरी आंतरविकी दुवा घालण्याची आठवण करावी.
२. विकिपीडियावरील सगळे अवर्गीकृत लेख येथे आहेत. जमेल तसे, तेव्हा ते चाळून शक्य तर वर्गीकृत करावेत.
अशा वर्गीकरणात शंका आली तर चावडीवर (किंवा जुन्या सदस्यांना थेट) विचारावे.
अभय नातू १५:२०, २८ जून २०१० (UTC)

विकिक्वोट

संपादन

सर्व विकि मित्रांना नमस्कार, मराठी विकिक्वोट विषयी असलेले विकिपीडिया:धूळपाटी२५ हे पान पहावे, शक्य ती मदत करावी. Gypsypkd ०५:३७, २९ जून २०१० (UTC)

विकिपीडिया:कौल

संपादन

Previously there was a Small Wiki Monitoring Team and further Meta introduced Global Sysop system, Since we at Marathi Wikipedia and Marathi Wiktionary has got sufficieant routin patrol from Marathi Wikipedians and also we have sufficient numbers of local sysops available.Earlier I did discuss this issue with User Abhay Natu to opt out of unnecessary involvement of Global Sysops , besides if any mistake happens from them , since they do not know local Marathi Wikipedia languge and localy agreed conventions, it is difficult to contact and prove certain aspects and would be time consuming for avarage marathi wikipedian who does not know what is meta and how it functions.Following is the discussion at meta and it seems we will need support vote at विकिपीडिया:कौल page to opt out.माहितगार ०६:३४, ३० जून २०१० (UTC)

काही शंका

संपादन

एखाद्या पानावर मजकूर भरुन त्याचे वर्गीकरण करून झलक बघत असताना वर्गीकरणाचे दुवे लेखाच्या शेवटी का दिसत नाहीत जे पान जतन केल्यावर दिसतात? झलक बघताना आणि जतन करा मध्ये हा अगदी छोटासा फरक का राहिला आहे? दुसरे असे की एखादे पान बनवतानाच चुकीच्या नावाने बनवले असता त्याचे नाव कसे बदलावे? कोलंबसाचे गर्वगीत बाबत असे झाले आहे. बाकी मराठी विकीने ३०,००० लेखांचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन. सिंहावलोकनाचे ते पानही पाहिले. सौरभदा ०८:४६, ३ जुलै २०१० (UTC)

झलक बघताना वर्गीकरणाचे दुवे पानाच्या अगदी खाली असतात. पानाची झलक, मग संपादन खिडकी, नंतर इतर मजकूर या सगळ्यांच्या खाली हे दुवे असतात.
लेखाचे नाव/शीर्षक बदलण्यासाठी त्याचे स्थानांतरण करावे.
अभय नातू १६:३५, ७ जुलै २०१० (UTC)

नमस्कार, मी मराठी विकिक्वोट वर प्रचालक म्हणून काम करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार मला ३ महिन्यांकरिता प्रचालक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. यासाठी मी विकिपीडियावरील सर्वांचे आभार मानतो. तुमच्या मुळेच हे शक्य झाले आहे. विकिक्वोट मध्ये काय काय करावे या विषयी सगळ्यांची मदत हवी. Gypsypkd ०५:४७, ५ जुलै २०१० (UTC)

साधनपेटी गायब

संपादन

एखादे पान संपादन करण्यासाठी उघडले असता डावीकडील स्तंभ लोगो सोडला तर पूर्णपणे रिकामा दिसत आहे. गेल्या एक-दोन दिवसांतच हे होत आहे. मला वाटते मिडियाविकी नामविश्वातील पानांतील बदलांमुळे हे झाले असावे.

शक्य तितक्या लवकर पूर्वीची साधनपेटी परत दिसू लागेल असे करावे.

अभय नातू १६:१९, १६ जुलै २०१० (UTC)

इंग्रजी विकिवर पुरेशी स्टेबल असलेली मिडियाविकी:Edittools.js मिडियाविकी:Edittools/chars हि दोन नवी पाने इंग्रजी विकिपीडियातून आयात केली होती व मिडियाविकी:Edittools मध्ये इंगीश विकिप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न केला. मिडियाविकी:Edittools.js मिडियाविकी:Edittools/chars मधील कंटेंटवर आता नो विकि लावले आहे. आता बरोबर दिसते का ते कुकीज मुळे मला लगेच लक्षात येणार नाही.या करिता कुक्की वगळून तपासून लगेच संदेश द्यावा. तरी फरक पडला नाही तर या तिन्ही टिकाणच्या बदलांवर द्रूतमाघार घ्यावी लागेलमाहितगार ०५:१८, १७ जुलै २०१० (UTC)
मी कुकीज काडून पाहिले.मला प्रॉब्लेम आता केवळ फायरफॉक्सवर येत आहे.इंटरनेट एक्सप्लोररवर येत नाही आहे.माहितगार ०५:२७, १७ जुलै २०१० (UTC)