विकिपीडिया:गौरव समिती/शिफारस
मुखपृष्ठ | गौरव | गौरव समिती | गौरव शिफारस | गौरव समिती चावडी | आभार | गौरव समिती संपर्क |
नक्षत्रांचे देणे ...!संपादनविकिपीडियामधील योगदात्यांना त्यांच्या मेहनतीच्या व कठोर परिश्रमाच्या मोबदल्यादाखल बार्नस्टार देण्याची परंपरा आहे. आपण येथे कोणत्याही सदस्यास गौरव देण्याबद्दल गौरव समितीस शिफारस करू शकता किंवा नामांकन देऊ शकता. एखाद्या सदस्यास बार्नस्टार मिळायला हवा, असे जर तुम्हास वाटत असेल, तर अजिबात संकोचू नका !. बार्नस्टार शिफारस देताना सदस्याच्या कामाबद्दल कृतज्ञता दर्शवणारे योग्य असे वर्णन/तपशील पुरवण्यास विसरू नका. गौरव येथे सध्या वापरात असलेले काही बार्नस्टार व पुरस्कार दाखवले आहेत. जर आपण शोधत असलेल्या विषयाशी संबंधित बार्नस्टार तेथे सापडला नाही, तर आपण आपल्याला अभिप्रेत असलेला पुरस्कार स्वतःच बनवून तो वापरण्याची शिफारस करू शकता. आपल्याला काही शंका असल्याच किंवा काही माहिती हवी असल्यास, गौरव समिती चावडी या पानावर समितीस साहाय्याची विनंती करा. बार्नस्टारांचे अनेक प्रकार आहेत. आपली निवड नेमकी आणि चपखल असल्याची खातरजमा करा, जेणेकरून बार्नस्टाराचा अनुचित/गैरलागू वापर संभवणार नाही. तसेच हेही ध्यानात असू द्या, की कोणाच्याही कामाची प्रशंसा करण्यासाठी चर्चापानावर कौतुक करण्यासारखे अन्य सहजसोपे व अनौपचारिक मार्ग कायम खुले आहेत. शिफारसी येथून खाली कराव्यासंपादनदहाव्या वर्धापनदिना निमीत्त गौरवनिशाणसंपादन
|