विकिपीडिया:गौरव समिती/चावडी
मुखपृष्ठ | गौरव | गौरव समिती | शिफारस | गौरव समिती चावडी | आभार | संपर्क |
मराठी विकिपीडिया गौरव समितीसंपादनमराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करते आहे. काही नवीन आहेत म्हणून तर काही जुनी झाली म्हणून दुर्लक्षित आहेत (जाणून बुजून नाही ). कामे करण्याच्या नादात/कामात, कामची कदर करण्यासच आम्हाला बरेचदा वेळ मिळत नाही. काम करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौर्वासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापा बरोबरच त्यची योग्य रीतीने कदरपण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपिडीयावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समितीची " स्थपना करण्यात येत आहे. सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सम्पादन योगदानाचे गौरव जसे १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारीस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवहि प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून हि समिती कार्य करेल. मराठी विकिपीडिया गौरव समितीत सामील होऊन गौरव प्रक्रियेत योगदान देऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी आपले नाव खाली नोंदवावे. आपल्या भरीव सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद राहुल देशमुख १३:१३, १७ जानेवारी २०१२ (UTC)
सांगकाम्यांना गौरवण्या साठीसंपादनआर म्हंजे आता पघा दोनतीन धनगरानी त्येंची कुत्री म्हंजे ते सांगकामे का काय ते सोडली आन केलं धा हजार बदल म्हंजे मग त्ये लय हुशार पन येकांदा शिलेदार मरमर मरुन करतो पाचपन्नास बदल तरी तो न्हाय हुशार. मग आता ह्यो गनित कसा सोडवयाचा ते सांगा की राव tipya
काय भौ, तुमास्नी नावडता प्रश्न विचारला म्हून काम आमास्नी ब्यान करुन टाकायचे काय? तुमच्या ब्यानाच्या म्येसेजात अटरफटर लिवतो म्हंता, पन तुमी माज्या प्रस्नाच उत्तर दिलत कि राव. म्हंजे तुमास्नी प्रस्न कल्ला तर. मग अटरफटर कस? का तुमास्नी आमची गावरान भासा आवडत न्हाय? आता सगलेच कसे पुन्यामुंबइकडले गावनार तुमास्नी? आमच्यासारक्या जांभुळवाडीतल्या लोकास्नी पन आवाज हाय का न्हाय हित? का फक्सत शुद मराठी बोलनार्यांनाच हित लिवता येतो? आता पुन्ना येकदा ईचारतो पघा. हित तुमी देनार गौरव का काय ते आशा लोकास्नी ज्येनी ५००० येळा संपदने केली. मग येकांद्यानी त्येचा कुत्रा (म्हंजे सांगकाम्या, भौ) सोडून केली ही ५००० संपादने, आन ही संपादने केली आपल्याच नावानी तर मग त्यास्नी कसा देनार हा गौरव? ह्यो तर चिटींग झालं न्हाय का? आन पघा माज्यासारक्या गावरान मानसाकड न्हई सांगकाम्या आन केली मी दोनपाचशे संपादन. पन चिटींग करनारा म्होटा कारन त्याने सोताच्याच नावावर कुत्रा सोडून आपली तुंबडी भरली. ह्यो गनित काय जमल न्हाय आपल्याला. आन ह्यो विचारल तर ब्यान आला कि तेज्या आवशीचा आन आख्खे तीन दिवस ब्यान करुन टाकल काय कारनास्नी ह्यो कलवा. ब्यान केल तर केल पर आमचा पत्ता का काय ते बी अडवून टाकला. आता तुम्ही हितले मालक म्हून काय वाटेत ते करायचा का काय? आन आता हे लिवल म्हून आजून ३ म्हिने ब्यान डोस्क्यावर घालू नगा म्हंजे ईटोबा पावला tipya
|