विकिपीडिया:कौल/खाते विकसक
हे पान विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर, यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरीता आहे.
खाते विकसक अधिकाराबाबत
संपादन@अभय नातू आणि V.narsikar:
- मला २४ आणि २५ जाने २०१९ रोजी दोन कार्यशाळा लातूर आणि उदगीर, येथे घ्यावयाच्या आहेत आणि दोन्हींही ठिकाणी, मोबाईलची उपलब्धता आणि इंटरनेटची पोहोच याबाबत शंका असणार आहेत, तेव्हा
- या दोन दिवसांसाठी आणि पुढील काही कार्यशाळांसाठी खाते विकसक अधिकार हवे आहेत. आपण ही बाब ताबडतोब निकाली लावल्यास शतश: आभार,
- वेळेची कमतरता असल्याने इतर कोणत्याही शक्यता हातात नाहित अचानक कार्यशाळेत सहा खात्यांची मर्यादा असल्याने गोंधळ होतो हे गेल्या काही कार्यशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. धन्यवाद. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १९:५२, २२ जानेवारी २०१९ (IST)
@QueerEcofeminist: आपण मराठी विकिपीडियावर असलेले धोरण विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर वाचले आहे का? हे अधिकार मिळवण्यासाठी आपण त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केली आहे. कृपया याची माहिती द्यावी. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २१:१८, २२ जानेवारी २०१९ (IST)
हो पाहिले आहे, आणि अनेकदा वाचले आहे, मराठी/मेटा विकी/इंग्रजी सगळे वाचून झाले आहे. धन्यवाद! QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २१:३४, २२ जानेवारी २०१९ (IST)
- वाचले ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद परंतु जे प्रक्रिया आवश्यक आहे हे अधिकार मिळवण्यास याचे पालन केले आहे का? आपण याचे उत्तर दिले नाही. --Tiven2240 (चर्चा) २१:४२, २२ जानेवारी २०१९ (IST)
@अभय नातू:
- पुन्हा एकदा आठवण, मला मराठी विकिवर खाते विकसक अधिकार हवे आहेत, आणि तशी विनंती मी करून अनेक दिवस झालेले आहेत, स्थानिक विकिवर ब्युरोक्रेट यांनी ते अधिकार द्यावेत असे धोरण असल्याने ते मेटावरील विनंतीनूसार मला देण्यात आलेले नाही, माझ्या ह्या विनंतीवरही आपला काहीही प्रतिसाद अजून आलेला नाही.
- मला सध्या २५ तारखेपर्यंत टेस्ट विकिवर खाते विकसक अधिकार आहेत, मागील दोन कार्यशाळात त्याचा उपयोग झाला आहे, पुढे तसाच वापर होणार आहे. पुढे काही कार्यशाळा अपेक्षित आहेत. त्यामुळे हे अधिकार मला मराठीवर देण्यात यावेत ही विनंती. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १४:२८, ५ फेब्रुवारी २०१९ (IST)
- @QueerEcofeminist:,
- येथे कौल घेणे अपेक्षित आहे तरी तसा कौल लावावा.
- तुम्ही कार्यशाळा घेणार असल्याने त्याला अडचण होऊ नये म्हणून कौल घेण्याआधीच या कार्यशाळांसाठी हा अधिकार देत आहे.
- पुढे तसाच वापर होणार आहे. पुढे काही कार्यशाळा अपेक्षित आहेत. याचा कार्यक्रम किंवा मुदत द्यावी. सध्या १० मे (३ महिने) पर्यंत हा अधिकार देत आहे.
- अभय नातू (चर्चा) ०१:३८, ११ फेब्रुवारी २०१९ (IST)
- @अभय नातू: येत्या दहा तारखेला माझे खाते विकसक अधिकाराची मुदत संपेल तरी, या महिन्यात व पुढील महिन्यात मला खाते विकसक अधिकाराची गरज पडणार आहेच. आपण हे अधिकार कायम करावेत ही विनंती. (नेहमीच अधिकार वापरावे लागतात असे नसले तरी, ते असणे फ़ायद्याचे ठरते.) QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:३०, ३ मे २०१९ (IST)
- @QueerEcofeminist:,
- तुम्ही आत्तापर्यंत किती खाती तयार केली व कधी याची जंत्री नसली तरी साधारण कल्पना देता येईल का?
- अभय नातू (चर्चा) ०५:०७, ५ मे २०१९ (IST)
- @अभय नातू: आपण मी केलेल्या खात्यांची यादी येथे पाहू शकाल,
- टेस्ट विकीवरून केलेल्या खात्यांची माहिती. त्यात कारण आणि कोणत्या कार्यक्रमासाठी केले आहे हे प्रत्येक खात्याच्या निर्मितीच्या सारांशात लिहिले आहे.
- मराठीवर केलेली खाती. हे अधिकार उशीरा मिळाल्याने आणि कार्यशाळेच्या जागी तांत्रिक अडचणी असल्याने फार वापर झाला नाहीये. पण ऐनवेळी अडचण आल्यावर इतर पर्याय नसतात आणि घोळ होतात. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:००, ५ मे २०१९ (IST)
- ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तयार करुन दिलेल्या खात्यांच्या वापरकर्त्यांनी मराठी विकिवर अभावानेच योगदान केलेले दिसत आहे.
- अनेकदा असा प्रकार एकगठ्ठा सॉकपपेट खाती तयार करण्यासाठी केलेला दिसतो. अर्थात तुम्ही हे केलेले नाही असेच मानीत आहे परंतु इतर प्रचालक/प्रशासक/अधिकारी याबद्दल शंका घेऊ शकतात तरी तुम्ही खाती तयार करुन दिलेल्या संपादकांना योगदान करण्यासाठी उद्युक्त करावे ही विनंती.
- या अधिकाराची मुदत वाढवून देत आहे.
- अभय नातू (चर्चा) ०४:२३, १० मे २०१९ (IST)