विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/३ जून २०१२
दुराणी साम्राज्य (पश्तो: د درانیانو واکمني ;) हे इ.स. १७४७ ते इ.स. १८४२ या कालखंडात अफगाणिस्तानात अस्तित्वात होते. इ.स. १७४७ साली अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने कंदाहारात त्याची स्थापना केली. इ.स. १७७३ साली अहमदशाहाचा मॄत्यूनंतर त्याच्या वंशजांकडे साम्राज्याचे अमीरपद चालू राहिले.
परमोत्कर्षाच्या काळात दुराणी साम्राज्य पंजाबापासून इराणापर्यंत व मध्य आशियातील अमू दर्या नदीखोर्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. इ.स. च्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भरभराटीत असलेल्याओस्मानी साम्राज्याखालोखाल विस्तार पसरलेले हे दुसरे इस्लामी साम्राज्य होते.