विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१३ मार्च २०१०

क्लोद मोने (फ्रेंच: Claude Monet) हा एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद, अर्थात इंप्रेशनिझम, शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो. मोने हा त्याच्या ऊन-सावल्यांचा सळसळता खेळ दर्शविणार्‍या चित्रांकरिता ओळखला जातो. ब्रशाच्या जलदगतीने मारलेल्या छोट्या-छोट्या फटकार्‍यांनी रंगवलेल्या मूलभूत रंगछटांच्या तुकड्यांतून चित्र साकारण्याची पद्धत दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीत वापरली जाते. चितारताना दिले गेलेले हे मूलभूत/ शुद्ध रंगछटांचे तुकडे, ब्रशाचे दिसण्याजोगे फटकारे यांचा प्रेक्षकाच्या नजरेतच मिलाफ होऊन विविधरंगी चित्राची प्रतिमा/ चित्राचा दृक्‌ प्रत्यय जाणवतो. (पुढे वाचा...)