वासुदेव हरी चाफेकर
वासुदेव हरी चाफेकर (इ.स. १८८० - ८ मे, इ.स. १८९९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होत.
जीवन
संपादनवासुदेवांचा जन्म इ.स. १८८० मध्ये पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या त्यांच्या बंधूंसह सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्याच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. ८ मे इ.स. १८९९ मध्ये येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |