वानिवडे
वानिवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
?वानिवडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवगड |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
कातळशिल्पाचे गाव
संपादन[१] सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेले वानिवडे- पावणाई गाव. गावी जाण्यासाठी टेंबवली-वानिवडे,मोंड-वानिवडे व तळवडे-वानिवडे असा तरीचा (होडी) प्रवास करून गावात प्रवेश करता येतो. थोडा वळसा मारून गाडीने थेट गावात असा प्रवासही करता येतो. देवगड मोंड खाडी किनाऱ्याच्या विहंगम सृष्टी सौंदर्यात वसलेल्या वानिवडे गावाने जागतिक स्तरावर वैविध्यपूर्ण असा ठसा उमटविला आहे. किनाऱ्यावर माडबागायती आंबा,फ़णस व काजूची केलेली लागवड यामुळे गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडली.
गावाची रचना ही सरळ खाडी किनाऱ्यालगत म्हणजे एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला निसर्गसंपन्न डोंगर जमीन अशी आहे. गावातून जाणारा प्र.जि.मा.१२ हा सागरी रस्ता सर्व वाडीतून जात असून खाडी किनाऱ्याने जातो.
भारतीवाडी,मंगरवाडी, राणेवाडी व भटवाडी हे बापर्डे मोंड नदी किनाऱ्यावर तर बांदकर वाडी,करंजे वाडी , सरवणकर वाडी, धुरीवाडी, सावंतवाडी, घाडीवाडी, बौद्ध वाडी सुतारवाडी व लाडवाडी या वाड्या मोंड देवगड खाडी किनाऱ्यावर वसलेल्या आहेत त्यामुळे खाडीत मासेमारी ही केली जाते.
गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई हे पुरातन, प्राचीन काली जागृत दैवत आहे. मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे. तिच्या हातात ढाल, तलवार, गदा अशी शस्त्रे आहेत. घाडी मंडळी रोज या देवीची पुजा करतात.डोंगरावर देवीचे मंदिर असल्यामुळे संपूर्ण गावचा विचार करता ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच हे मंदिर सपाट कातळ जमिनीवर आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे, त्यामुळे निसर्ग सानिध्याने नटलेलं आहे. मंदिराच्या समोरच सुमारे ५०० मीटर अंतरावर पुरातन काळातील कातळ शिल्पे कोरलेली आहेत. परिसराच्या आजुबाजुस लोकवस्ती नाही.वस्ती गावापासुन जवळजवळ २ कि.मी. अंतरावर दूर आहे.आजुबाजूला कुठेच पाण्याचा स्रोत नसताना मंदिराच्या शेजारी मात्र गुहेच्या आकाराची विहीर असून त्याला मात्र पुष्कळ थंडगार पाणी आहे व ते सहज हाताने काढण्यासारखे आहे. गावकऱ्यांनी व भाविक भक्तांनी जिर्णोद्धार करून एक सुंदर देखणे मंदिर उभारले आहे. वानिवडे गावची देवी पावणाई देवी हे प्रमुख ग्रामदैवत असुन आकारी ब्राम्हण,देवी भावई देवी भवानी दसरोत्सवात देवी पावणाईच्या उजव्या बाजूला विराजमान होते. त्यानंतरच दसरोत्सवाची घटस्थापनेने सुरुवात केली जाते. गावातील बारापाचाचे मानकरी व गावकरी मिळून प्रबोधिनी एकादशी दिवशी हरीनाम सप्ताह, दसरा, होळी आणि अन्य उत्सव साजरे करतात. देवळाचा वर्धापनदिन वसंतपंचमीला उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात गोवा, कारवार आणि मुंबईतील लोक सहभागी होतात.यावेळी आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक येतात. विजयदुर्ग किल्ल्यावरील सेनानी धुळप यांच्या पागेतील घोड्यांना गोचिड या पिसवांचा उपद्रव होत होता. वैद्यांकडून औषधउपचार ही केले मात्र त्याचा काही उपयोग होत नव्हता. घोडे मात्र दिवसेंदिवस या आजाराने खंगत चालले होते. वानिवडे गावच्या देवी पावणाईची ख्याती धुळपांच्या कानी पडताच त्यांनी देवीस सांगणे केले, त्यावेळी देवीने जाऊन त्यांचे संकट निवारण केले. धुळप यांनी नवसाची परतफेड म्हणुन देवीला एक मशाल व पंचारती भेट दिली या दोन्ही वस्तु मंदिरात आहेत धुळप यांनी मंदिराला जमीनही इनाम दिली. वानिवडे गावचे महसूली दोन गाव झाले असुन एका गावाला देवीचे नाव दिले आहे. त्यामुळे आता ती दोन गावांची ग्रामदेवता आहे. वानिवडे गाव आणि पावणाई गाव.
गावच्या मुख्य रस्त्याला जोडून मंदिरात जाणाऱ्या रस्त्याच्या उजवीकडे जाणारा रस्ता हा कातळ शिल्पाकडे जातो. सड्यावर असलेली ही कातळ शिल्पे ही पांडवांनी काढली असे गावी बोलले जात होते पण आत्ता संशोधकांच्या मते इसवी सुमारे १० हजार वर्षांपूर्वीची प्राचीन ऐतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art)किंवा पेट्रोग्लिफ्स (petroglyphs)या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणात पाहण्यास मिळतात.
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३