वाजिद खान , (१० मार्च, इ.स. १९८१ ; मंदसौर , मध्य प्रदेश ) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खिळेकलावंत (नेल आर्टिस्ट), पेटंट धारक आणि चित्रकार आहेत. वाजिद खान नेल आर्टचे पेटंट मिळवणारे जगातील पहिले कलावंत आहेत.[१]

वाजिद खान

पूर्ण नाववाजिद खान
जन्म मार्च १० , इ.स. १९८१
मंदसौर , मध्य प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नेल आर्ट, चित्रकला
पुरस्कार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉऱ्ड्स, लिम्का बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉऱ्ड्स
वडील वाहिद खान
आई रोशन आरा

प्रारंभीचे जीवन संपादन

मंदसौरपासून ११ किलोमीटर अंतरावर सोनगिरी नावाचे एक छोटे गांव आहे, तिथेेच वाजिद खान यांचे लालनपालन व पोषण झालेले आहे. त्यांच्या नावाचे पाच जागतिक विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड बुकमधे नोंद झालेले आहेत. मुंबईपासून ते दुबईपर्यंत त्यांच्या कलेचे कौतुक होत असते. नेल आर्ट पासून ते शिल्पकलेपर्यंत विविध कलांत त्यांनी कौशल्य मिळावले आहे आपल्या कलेने त्यांनी अनेक कलाप्रेमी लोकांना आकर्षून घेतले आहे.

वाजिद यांचे बालपण मंदसौरजवळच्या एका छोट्या गेलेले आहे. या गावात फक्त ३५ घरे आहेत. या गावात फक्त शेतकरी व मजूर राहतात. कला क्षेत्रात नाव कमसविण्यापूर्वी वाजिद यांचे आयुष्य, पाच भाऊ आणि दोन बहिणी यांच्या सोबत साधारण मुलांसारखेच व्यतीत झाले. परंतु मन चंचल आणि विचार कलात्मक होते. त्यामुळे ते साधारण वस्तूपासून असाधारण रचनात्मक कार्य करण्याचे सतत प्रयास करत असत. त्यासाठी त्यांना घरातील वडीलधाऱ्यांकडून बरेचदा फटकारे मिळत. थोडी समज आल्यानंतर व मोठे झाल्यावर काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने त्यांनी कलाक्षेत्रात पाय ठेवला. ते शाळेच्या अभ्यासात अत्यंत कच्चे होते, त्यांना पाढे सुद्धा पाठ हॊत नसत. ते पाचवीत गेले आणि त्यांच्या घरातील मंडळी त्यांच्या कलावेडाने हैराण झाली होती. जेव्हा शॆती करणारे वडील त्यांच्या वर नाराज होत होते, त्यावेळी वाजिद जगातील सर्वात छोटी प्रेस बनविण्यात मग्न होते. स्टीलचा वापर करून वाजिद यांनी जगातील सर्वात छोटी इस्त्री बनवून सर्वानाच आश्चर्यचकित केले होते.

कलाकृति संपादन

 
खिळे वापरून बनवलेले महात्मा गांधीचे चित्र
 
ऑटोमोबाइल पार्ट्स वापरून बनवलेले चित्र

१४ वर्षाचे असतांनाच त्यांनी पाण्यावर चालणारे एक छोटे जहाज बनविले. जमीन, पाणी यांच्यावरची वाहने बनवल्यावर त्यांनी आकाशात उडणारे हेलिकाॅप्टर बनवून टाकले. बनविण्यात आलेल्या रचनांची जेव्हा प्रशंसा होऊ लागली तेव्हा वाजिद यांच्या स्वप्नांचे पंख फडफडू लागले. युवा अवस्थेत पोहोचेपर्यंत त्यांनी पाणी चोरी रोखण्यासाठीच्या यंत्रासह एकून २०० शोध करून टाकले. हे सर्वे शोध ज्यांनी बघितले ते थक्कच झाले. परंतु उचित मार्गदर्शनाच्या अभावी ह्या शोधांना ते उचित प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत. घरात कला रसिक येत राहिले आणि वाजिदच्या कलेवर घरच्या लोकांचा राग वाढत गेला. शॆवटी शाळा सोडल्यानंतर त्यांनी घर सोडायचा पण निर्णय घेतला.


आणि त्यानंतर कलेला ओळख प्राप्त करून देणे व आपले जीवन सफळ करणॆ यांसाठी वाजिद यांचा खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू झाला. त्यांच्या आईने दिलेले १३०० रुपये घेऊन त्यांची कला यात्रा सुरू झाली. नातेवाईक व गावातले लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करीत वाजिद छोटे यंत्रमानव बनवायला सुरुवात केली. त्यानंतर हितचिंतकांच्या प्रयत्नांनी त्यांना माध्यमातून एन.आय.ई.एफ. अहमदाबाद ह्या संस्थेसाठी काम करायची संधी मिळाली. . त्यानंतर व्हीडियो टेप्सचे एडिटिंग शिकणयाच्या निमित्ताने ते इंदूरला आले, आणि येथूनच वाजिद यांच्या कलेचा प्रवास नव्याने सुरू झाला. या नव्या शहरात त्यांचे कलेचे कौतुक करणारे खूप भेटले. इंदूरमध्ये त्यांनी आपले चित्रकलेतले कौशल्य दाखविले परंतु वाजिद यांचे समाधान झाले नाही. त्यांना मुळात आवड होती ती सामान्य वस्तूपासून असाधारण वस्तू बनवायची. त्यांनी चित्रकला सोडून हातात थर्माकोल घेतला. १९९८ मध्ये त्यांनी थर्माकोलपासून कलात्मक वस्तू बनवायला सुरुवात केली; त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

वाजिद यांनी सन २००२मध्ये एका अश्या कलेवर काम सुरू केले की ज्यावर जगात कोणीच काम केले नसेल. अतिशय छोट्या छोट्या खिळयांना एका विशिष्ट शैलीत कार्डबोर्डावर ठोकत-ठोकत त्यांनी तेथे मानवी चेहरा उतरवला. पुढे चालून हातात इतके प्राविण्य निर्माण झाले कि खिळयांचा काळा भाग व बोर्डचा पांढरा भाग अश्या प्रकारे प्रभाव सोडायला लागला की बनविलेला चेहरा बोलका वाटायला लागला. नेल आर्ट ही जगामधली अजब कला आहे आणि जेव्हा वाजिद यांनी २००५ मध्ये याच माध्यमातून महात्मा गांधी यांचे पोट्रेट बनविले तेंव्हा ते बघणाऱ्यांना हे बघुन एक सुखद धक्का बसला. ह्याच वर्षी वाजिद यांनी जगातली पहिले थ्री डी चित्र बनविले, त्यामधे केनवास वर ऐक्रेलिक कलरचा वापर केला. वर्ष २००९ पर्यंत नेल आर्टला ओळख मिळालेली होती. काही काळ गेल्यानंतर वाजिद यांनी त्याचे आपले नावावर पेटेंट करून घेतले. येथूनच वाजिद यांचे नाव वल्र्ड रिकार्ड बुक्स मधे आले. गिनीज बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, गोल्डन बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, लिम्का बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, इंडिया बुक आॅफ वल्र्ड रिकार्ड, एषिया बुक आॅफ वल्र्ड रिकार्डनी वाजिद यांचा सत्कार केला. तसेच दुसÚया बाजूला महात्मा गांधी नंतर नेल आर्ट द्वारे साई बाबा, धीरूभाई अंबानी, दुबई किंग राषिद अल मख्तूम आणि त्यांचा मुलगा हमदाम बिन रषिद अल मख्तुूम यांचा पोट्रेट बनविला. आई आणि मुलाच प्रेम दर्षवनारी नेल आर्ट कलाकृति मध्ये चित्रित भावनेनी दर्षकांना अक्षरषः भावूक केले. खिळयांनी बनविलेल्या चेहरेची मोहकता वाढत चालली होती. या कलेची कीर्ति वेगानी वाढली आणि प्रदर्षनांचा दौर सुरू झाला. जेंव्हा कलाकाराची कला पूर्ण वाटायला लागते तेंव्हा कलाकारला नवीन प्रयोग करण्याची जोखीम उचलावर लागते. वाजिद असल्या प्रकारच्या जोखीम उठाविण्या साठी लवकरच तत्पर झाले आणि तरुणपणातच त्यांनी नेल आर्टिस्टच्या स्थापित दर्जाच्या बाहेर स्वताला काढून घेतले व सन २००२ मध्ये त्यांनी नवीन आॅटोमोबाइल कला प्रारंभ केली, आॅटोमोबाइल कला तैयार करतांना त्यामध्ये त्यांनी बी.एम.डब्ल्यू, मर्सीडिज आणि बुलेट इ.चे पुर्जेंचा वापर केला. या पुर्जेंचा एकत्रित वापर करून त्यांनी भिंतीवर एक घोडा बनविला, या रचनाकृतिला दुरून बघतांना घोडा अष्वसवार बरोबर धावतांना दिसतो. हयांचे थ्री डी इफेक्ट आज पण इंदौर षहरातील एका प्रसिद्ध बंगल्यातील भिंतीवर कायम स्वरूपी लागलेले आहे. मध्यांतरी कालावधीत त्यांनी मुंबई, दुबई, इंग्लैंड इत्यादी ठिकाणी आपली कला प्रदर्षीत केली। खान यांनी कलेचा वापर फक्त आनंद देण्यासाठी व आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी केला नाही तर समाजा मध्ये जागरूकता प्रसारित करण्या साठी सुद्धा केलेला आहे। २०१४ मधे मुलगी वाचवा आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी चिकित्सा क्षेत्रातील वापरल्या जाणाÚया साहित्याचा वापर करून रडत असलेल्या एक निष्पाप मुलीचे कलाकृति बनविले।

संदर्भ संपादन

  1. ^ "Indore innovator turns junk into art [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2015-02-20. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन