वसंत नारायण मंगळवेढेकर

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर (११ डिसेंबर, इ.स. १९२५[१] - एप्रिल १, २००६:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.[१]

वसंत नारायण मंगळवेढेकर
टोपणनाव राजा मंगळवेढेकर
जन्म ११ डिसेंबर, इ.स. १९२५
मृत्यू एप्रिल १, २००६
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बालसाहित्यकार, कादंबरीकार, गीतकार
साहित्य प्रकार बालसाहित्य, चरित्रे, अनुवाद, कविता

राजा मंगळवेढेकरांचे साहित्य संपादन

पुस्तके संपादन

बालनाट्ये संपादन

  • चतुराई
  • बनवाबनवी

गीते संपादन

  • असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
  • ऊर्मिले त्रिवार वंदन तुला
  • कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा
  • सती तू दिव्यरूप मैथिली

पुरस्कार संपादन

  • गदिमा पुरस्कार (इ.स. १९९९)
  • फुलराणी थिएटरचा 'जवाहरलाल नेहरू स्मृती पुरस्कार' (इ.स. १९९७)
  • बालसेवा पुरस्कार (इ.स. १९९५)
  • बाबुराव शिरोळे बालसाहित्य पुरस्कार (इ.स. १९९७)
  • स्वातंत्र्यसैनिक मामा गवारे फाउंडेशनचा 'बाल आनंद पुरस्कार' (इ.स. १९९५)

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b संजय वझरेकर (११ डिसेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन