वर्ग चर्चा:मराठी पुस्तके

Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Padalkar.kshitij

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक), पोस्टमॉर्टम्‌ (पुस्तक) यात होती.

हे पान काढण्यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही एका गटाचा किमान ५१% पाठिंबा असल्यास हे पान काढण्यात यावे.

गट १ - एकूण २५७३८ सदस्यांपैकी पान वगळण्यासाठी किमान ५१% सदस्यांची सहमती असल्यास.

गट २- एकूण १७३ कार्यरत सदस्यांपैकी पान वगळण्यासाठी किमान ५१% कार्यरत सदस्यांची सहमती असल्यास.

गट ३ - एकूण ६५ सांगकाम्यांपैकी पान वगळण्यासाठी किमान ५१% सांगकाम्यांची सहमती असल्यास.

गट ४ - एकूण १२ प्रचालकांपैकी पान वगळण्यासाठी किमान ५१% प्रचालकांची सहमती असल्यास.

गट ५ - एकूण २ स्विकृती अधिकारी यांच्यापैकी पान वगळण्यासाठी किमान ५१% स्विकृती अधिकारी यांची सहमती असल्यास. 117.195.79.2 ०१:५६, २९ जून २०१२ (IST)Reply

पान काढण्यासाठी बहुमत हवे असे धोरण मराठी विकिपीडियावर असल्याचे आठवत नाही.
अभय नातू (चर्चा) ०४:४१, २९ जून २०१२ (IST)Reply
अभय नातू यांच्याशी सहमत. शिवाय "वर्ग: मराठी साहित्य नामसूची" हा वर्ग आहेच.
Mvkulkarni23 १२:१७, २९ जून २०१२ (IST)
पान काढण्यासाठी कोणत्याही बहुमताची गरज नाही/नसावीच. पण पान ठेवण्यासाठी मात्र विश्वकोशीय परीप्रेक्षातून उल्लेखनीयता महत्त्वाची असते. मराठी पु्स्तके या पानाच्या नावाला जरी उल्लेखनीयता असली तरी मराठी साहित्य नामसूची हे त्याच्याशीच साधर्म्य असलेले पान/वर्ग त्याच्याहीपेक्षा अधिक उल्लेखनीय,सुसंगत वाटते.
जसे पुणे पर्यटन स्थळे या नावाला उल्लेखनीयता आहे पण पुण्यातील पर्यटन स्थळे हा त्याच्याहीपेक्षा अधिक उल्लेखनीय, सुसंगत आणि चपखल आहे. पुण्यापासून समजा ५०-६० किलोमीटर अंतरावर दौंड तालुक्यातील यवत गावात भुलेश्वरसारखे एखादे पर्यटन स्थळ आहे त्या पानाला पुणे पर्यटन स्थळे किंवा पुण्यातील पर्यटन स्थळे हे वर्गही उल्लेखनीयतेचा विचार केला तर चालू शकतील पण त्या पानाला पुणे परिसरातील पर्यटन स्थळे या वर्गात टाकणे त्याहूनही अधिक अर्थवाही, सुसंगत आणि चपखल.(कोणच्याही एखाद्या गटाला Target करण्याचा हेतू नाही. चर्चेच्या ओघात फक्त माझे मत नोंदवले. मला खात्री आहे माझे मत सार्वकालिक (कधीही) कुणालाही मान्य होईल असेच आहे. मान्य करण्याचीच कुवत नसेल तर मात्र नाईलाज आहे.)
ता.क. छोट्याशा कारणावरुन वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत असल्यास वर्ग:मराठी पु्स्तके या पानाला वर्ग:मराठी साहित्य नामसूची कडे पुनर्निर्देशित करुन देता येईल.
-संतोष दहिवळ (चर्चा) ०१:४७, ३० जून २०१२ (IST)Reply
काही काळ थांबून पान काढण्यास पाठिंबा.
सामान्यतः वर्गांचे पुनर्निदेशन केले जात नाही. येथे अधिक वाचा
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०३:३१, ३० जून २०१२ (IST)Reply
मला वाटते आपले सगळ्यांचेच --
पान काढण्यास बहुमत गरजेचे नाही आणि या पानाची उल्लेखनीयता किंवा उपयुक्तता नगण्य आहे तरी हे पान काढावे.
-- यावर एकमत आहे.
काही काळ थांबून कोणत्याही प्रचालकाने हे पान वगळावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०२:०८, ३० जून २०१२ (IST)Reply
"मराठी पुस्तके" पानाकडे परत चला.