वर्ग चर्चा:टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष

टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष हेच शुद्धलेखन बरोबर आहे. टेक्सासचे प्रजासत्ताक हे एकवचनी विशेष नाम आहे व त्याचे विभक्तीरूप वेगळे होते.

जसे अभयचे घड्याळ, अभयाचे घड्याळ नव्हे किंवा विलासची खुर्ची, विलासाची खुर्ची नव्हे, इराणचे पंतप्रधान, इराणाचे पंतप्रधान नव्हे.

विशेषनाम नसताना तुम्ही म्हणल्याप्रमाणे शब्दात 'आकार' येतो, जसे ताक - ताकाची कढी, दार - दाराची कडी, इ.

याला अपवादही आहेत...भारताचे पंतप्रधान, इ.

अभय नातू २०:०५, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)


उ.:टेक्सासचे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष संपादन

अभय, खरे तर तुम्ही लिहिलेली 'अभयचे घड्याळ, विलासची खुर्ची, इराणचे पंतप्रधान' ही सर्वच उदाहरणे व्याकरणदृष्ट्या नियम मोडून (सध्या) वापरात असलेली आहेत. कारण विशेषनामेदेखील विभक्तीरूप घेताना 'आ'कार/ 'ए'कार वगैरे जोडले जाऊन 'व्यय पावतात'. उदा.: कृष्ण - कृष्णाला, कृष्णाचे, कृष्णाने; सीता - सीतेला, सीतेने; भारत - भारतात, भारताचे, अरण्य - अरण्यात, अरण्याचा वगैरे. ही सर्व विशेषनामे आहेत. सर्व प्रकाराची नामे (सर्वनामे, सामान्यनामे, विशेषनामे) विभक्ती होताना त्यांचे मूळ रूप बदलतात.. म्हणजेच 'व्यय पावतात' म्हणून व्याकरणदृष्ट्या 'अव्यय' गटात न मोडता 'व्यय' गटात मोडतात. त्यामुळे खरे तर 'भारतीय प्रजासत्ताकाचा पन्नासावा वर्धापनदिन' वगैरे शब्दयोजना केली जाते. तद्वतच 'टेक्सास प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष' हे विभक्तीरूप व्याकरणदृष्ट्या अचूक आहे. किंबहुना उदाहरणादाखल तुम्हीच 'प्रजासत्ताक' या नपुंसकलिंगी शब्दाची सप्तमी विभक्ती (प्रत्यय: त, ई, आ) चालवून बघा.. तिचे रूप 'प्रजासत्ताकात' असे होईल; 'प्रजासत्ताकत' असे होणार नाही. कारण अकारान्त नपुंसकलिंगी शब्दांत विभक्तीरूप जोडताना मूळ शब्दाच्या अंत्याक्षरास 'आ'कार जोडला जातो.
तसेच खरे तर 'अभयाचे घड्याळ, विलासाची खुर्ची, हिंदुस्तानाचे पंतप्रधान, इराणाचे अध्यक्ष' हे शब्द व्याकरणदृष्ट्या योजले पाहिजेत. पण हिंदीच्या प्रभावाने म्हणा (ईरान के प्रधानमंत्री, विलास की कुर्सी इत्यादी; कारण हिंदीमध्ये नामांच्या एकवचनी विभक्तीरूपाचा व्यय होत नाही.) किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे म्हणा ही उदाहरणे तुम्ही म्हणता तशी व्याकरणबाह्य पद्धतीने लिहिली जातात. आपल्याकडे आपल्या आजोबा-आजींच्या पिढीपर्यंत व्याकरणाचे पुस्तकी शिक्षण घेतले नसून देखील व्याकरणाचे नियम पाळले जात.. ते लोक 'जयंताची सायकल/ संध्येचा शिवणक्लास/ कर्नाटकाचा प्रवास' वगैरे शब्दयोजनांत व्याकरण पाळत. सध्या याच शब्दयोजनांची 'जयंतची सायकल/ संध्याचा शिवण क्लास ('शिवणक्लास' असा सामासिक शब्द नव्हे हं. :P)/ कर्नाटकचा प्रवास' अशी रूपे होतात.

असो. मला व्याकरणदृष्ट्या जेवढे विवेचन करायचे होते, त्यापेक्षा जास्त लिहिले गेले आहे. तरी पण मूळ मुद्दा बाजूला पडला नसावा अशी आशा आहे. :)

--संकल्प द्रविड ०५:१४, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

Need to decide if we're going to stick to one norm or the other.
अभय नातू ०५:२७, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)


टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष बरोबर कि टेक्सासचे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष?
"टेक्सासचे प्रजासत्ताकाचे " मध्ये टेक्सासचे '' चे प्रत्ययाची व्याकरणदृष्ट्या आवश्यकता आहे काय ? "टेक्सास प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष " असेही लिहिता येईल का? प्रजासत्ताकाचे व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे यात वादच नाही.
सामान्यरूपांबद्दल आणि पदांबद्दल मराठी व्याकरणातील वेगळेपणाची

लोकांना पुरेशी कल्पना नसते,विकिपीडियाकरिता व्याकरण विषयक लेखन करण्याकरता जे वाचन केले त्यापुर्वी तसे द्न्यान मलाही नव्हते.भाषा काही प्रमाणात बदलती असते तेव्हा माझे मत आहे कि अती आग्रह धरूनये .पण जीथे चूका लक्षात येतील व शक्य असेल तीथे मुळ मराठी व्याकरण नियमाचे पालन घडण्याच्या दृष्टीने दुरूस्त्या कराव्यात.

Mahitgar ०६:११, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

हा वर्ग चुकीचा आहे. व्याकरणाचा प्रश्न नंतर येईल, टेक्सास प्रजासत्ताक अस्तित्वात नाही. टेक्सास हे अमेरिकेचे राज्य आहे व टेक्सासचे राज्यपाल हा योग्य शब्द होईल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०७:५२, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

हा वर्ग चुकीचा मुळीच नाही. मेक्सिकोपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टेक्सासला काही वर्षांसाठी स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्त्व होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सामील झाले. या दरम्यान टेक्सासच्या प्रजासत्ताकला राष्ट्राध्यक्ष, ध्वज, संविधान, इ. होते.

टेक्सासचे राज्यपाल कि टेक्सासाचे राज्यपाल :-P

अभय नातू १५:५४, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)

"टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष" पानाकडे परत चला.