Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.
वरणफळे

साहित्यसंपादन करा

 1. कणिक
 2. हळद
 3. तिखट
 4. मिठ
 5. शेंगदाणा तेल
 6. तुरीची डाळ
 7. मोहरी
 8. चिंच
 9. गुळ/साखर(चवीसाठी)
 10. ओवा

पुर्व तयारीसंपादन करा

प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या.कणकीत हळद,तिखट,मीठ,ओवा(थोडा)टाकुन घट्ट भिजवुन घ्या.त्याचे गोळे घेउन पणतीच्या आकाराच्या वाट्या (फळे)करुन घ्या.

कृतीसंपादन करा

शिजविलेल्या तुरीच्या डाळीस फोडणी देउन फोडणीचे पातळ वरण तयार करावयास ठेवा.त्यात चविसाठी चिंच,गुळ/साखर टाका.

कृती १) यात आता तयार केलेली फळे टाका. चांगले शिजु द्या.

कृती २) कणकीचे गोळे घेउन त्याच्या जाडसर पोळ्या लाटा,शंकरपाळयाच्या आकारात कापा .फोडणीचे पातळ वरणात चांगले शिजु द्या.

सजावटसंपादन करा

यास सजावट नाही.चिरलेली कोथिंबीर टाकुन खाण्यास द्या.

इतर माहितीसंपादन करा

ह्या पदार्थाला खान्देशात दाळचिखल्या आणि सातारा,सांगली येथे चकुल्या असे देखील म्हणतात.पोळ्या लाटण्यापासुन सुटका म्हणुन हा पदार्थ   पर्याय आहे.