वनवासी
जे डोगर कडेकपारीमध्ये आणि जंगलात राहतात अशा आदिवासी समूहासाठी वनवासी हा शब्द भारतातील काही विशिष्ट संघटना वापरतात(आरएसएस). हेच एकटे भारतातील मूळ निवासी नाहीत हे ठसवण्यासाठी या शब्दाचा जन्म झाला. आदीवासींच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती व परंपरा असतात. महाराष्ट्रात जवळपास ४५ आदिवासी जमाती आहेत .नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीचा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल, पारधीे, टोकरे कोळी ,कोरकू, गोंड, वारली , कोळी महादेव, पावरा, कातकरी ,कोलाम, जमाती आहेत. आदिवासी त्याच्या हस्तकौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांचे दंडाअराने हे नृत्य प्रसिद्ध आहे. या समाजाची इतर समाजापासून फारकत झाली आहे. त्यामुळे इतरांना मिळणाऱ्या सोईसुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत.
आदिवासींचे जनजीवन
संपादनआदिवासी स्वभावाने बुजरे असतात ते इतर समाजाशी सहसा लवकर मिसळत नाहीत. निसर्गालाच आपले देव मानणारे व वन म्हणजे अरण्यात वास्तव्य असल्याने काही स्वार्थी संघटना त्यांना वनवासी संबोधतात. मात्र केवळ वनवासी शब्दाचा विचार केल्यास वन (जंगल) + वास (वास्तव्य करणारे) = वनवासी. मग समजा अमेरिकेवरून आलेला माणूस जंगलात राहू लागला तर त्याला आदिवासींना असलेले सांविधानिक हक्क द्यायचे का? आता आदिवासी या शब्दाचा विचार करूया. आदि ( पूर्वीपासून ) + वास (वास्तव्य करणारे)= आदिवासी. त्यामुळे वनवासी आणि आदिवासी या दोन्ही शब्दांतील भेद लक्षात घेतला पाहिजे. आदिवासींना वनवासी संबोधणाऱ्यांचा कुटील हेतू वरील विवेचनावरून स्पष्ट होतो. सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून आदिवासींना आदिवासीच संबोधण्यात यावे. वरील लेखात पुन्हा बदल करून आदिवासी ऐवजी वनवासी शब्द वापरल्यास असे करणाऱ्याचे रक्त भेसळयुक्त असल्याचे समजण्यात येईल. तरी आपल्या आई वडिलांनी केलेल्या संस्काराची जाण ठेवून असा बदल करू नये.