लोहानी गाय
लोहानी गाय किंवा अच्छाई गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून बलुचिस्तान मधील लोरालाई जिल्ह्यात मुख्यतः आढळते. हा गोवंश दोन्ही देशात विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या डोंगराळ भागात आढळतो. हा मुळात मशागतीचा गोवंश होता, परंतु आता हा दुग्धव्यवसायासाठी सुद्धा वापरला जातो.[१]
वैशिष्ट्ये
संपादनहा मुख्यतः मशागतीचा गोवंश असून सध्या दुग्धोत्पादनासाठी देखील वापरला जातो. या गोवंशाचा आकार इतर अनेक प्रकारच्या गुरांपेक्षा लहान असून, सरासरी बैलाचे वजन ३०० ते ३५० किलो पर्यंत असते. त्यांचा कातडीचा रंग सामान्यतः पांढऱ्या डागांसह लाल असतो. गुरांचा चेहरा अरुंद, लहान कान आणि मोठे डोळे असतात. कपाळ किंचित उभारलेले असून आणि अनेकदा कपाळावर पांढऱ्या खुणा असतात. शिंगे सहसा मध्यम लांबीची, आकाराने जाड आणि उभी असतात. सामान्यतः शिंगांची लांबी १२ ते १८ इंच पर्यंत असते.[२][३]
आढळस्थान
संपादनलोहानींचा उगम पाकिस्तानातील लोराली येथून झाल्याचे मानले जाते. या गोवंशाचा आकार लहान असून पाय काटक असल्यामुळे असमान टेकड्या ओलांडण्यासाठी त्यांचे पाय तुलनेने लांब आहेत. येथील टेकड्या साधारणपणे ३००० ते १०,००० फूट उंच असतात. येथे टिकून राहण्यासाठी अनुकूल असल्याने आजमितीला पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात अनेक गुरे आढळतात. पाकिस्तानात त्यांना उपयुक्ततेमुळे 'अच्छाई गुरे' असे देखील म्हणतात.[२][३]
भारतीय गायीच्या इतर जाती
संपादनभारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
संदर्भ
संपादन- ^ "Breeds of Livestock – Lohani Cattle" (इंग्रजी भाषेत). ansi.okstate.edu. 2014-02-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "Breeds of Livestock in Pakistan – AgriHunt". agrihunt.com. 2014-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-02-12 रोजी पाहिले.
- ^ a b "Lohani Cattle" (PDF).