लोथा भाषा ही चीन-तिबेटभाषासमूहातील भाषा आहे जी भारताच्या पश्चिम-मध्य नागालँडच्या वोखा जिल्ह्यात सुमारे १,८०,००० लोक बोलतात [].वोखा जिल्ह्यात पंगती, मराजू (मेरपाणी), एंगलान, बागटी (पाकटी) आणि इतर अशी ११४हून अधिक गावे आहेत जिथे ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली आणि अभ्यासली जाते.

लोथा
Lotha
स्थानिक वापर भारत
प्रदेश वोखा जिल्हा, नागालँड
लोकसंख्या १.७९,४६७
भाषाकुळ
लिपी लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-३ njh

या भाषेला विकल्पाने चिझीमा, चोईमी, ह्लोता, क्यॉंग, ल्होता, लोथा, लुथा, मिलकाई, चिनदीर, आणि एथनोलॉग (Ethnologue) या वार्षिक नियतकालिकात लिहिल्याप्रमाणे चोंची असेसुद्धा म्हणतात.

बोलणे

संपादन

एथनोलॉगनुसार लोथा भाषेच्या या बोली आहेत. :

  • लिव्हे
  • त्सनत्सु
  • न्ड्रेंग
  • क्यॉंग
  • क्यो
  • क्यॉन
  • क्यूऊ

भाषाशास्त्रज्ञ जॉर्ज अब्राहम गॅरिसन यांनी भारतातील भाषांच्या विविध शाखांचे विश्लेषण केले आणि पश्चिमेकडील नागा, पूर्व नागा आणि मध्य नागा या तीन गटांमध्ये विविध नागा भाषांचे वर्गीकरण केले. [] लोथा भाषा ही आओ, सांगताम आणि यिमचुंग्रुसोबत मध्य नागा गटात आहे .[]

रूढ लेखन आणि साहित्य

संपादन

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश आणि अमेरिकन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या लॅटिन लिपीमध्ये लोथा लिहिली जाते. लोथा माध्यमातून नागालँड राज्यात पदव्युत्तर स्तरापर्यंतचे शिक्षण मिळते. लोथा भाषेत बायबलचे भाषांतर करण्यात आले आहे. त्यामुळे भाषेच्या शब्दसंग्रहात लक्षणीयरीत्या भर पडली. लोथा भाषेवर आसामी भाषेचा आणि हिंदीचा प्रभाव आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "२००१ जनगणना".
  2. ^ Kumar, Braj Bihari (2005-01-01). Naga Identity. Concept Publishing Company. p. 75. ISBN 978-81-8069-192-8.
  3. ^ Kumar, Braj Bihari (2005). Naga Identity (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 978-81-8069-192-8.

बाह्य दुवे

संपादन