जेम्स ब्राउन-रामसे तथा लॉर्ड डलहौसी हा ब्रिटीश भारतातील स्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता. इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रजी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानिक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत. या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने याना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानिक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती. यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली.[१].लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले[२].

जेम्स ब्रुमन रॅमसे
गव्हर्नर जनरल
Marquess of Dalhousie.JPG
लॉर्ड डलहौसी
Flag of the Governor-General of India (1885–1947).svg
गव्हर्नर जनरलचा ध्वज
Coat of arms of the East India Company.svg
इस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह
अधिकारकाळ १८४८-१८५६
राजधानी कलकत्ता
जन्म २२ एप्रिल १८१२
डलहौसी कॅसल, मिडल्टन, ब्रिटन
मृत्यू १९ डिसेंबर १८६०
युनायटेड किंग्डम
वडील जॉर्ज रॅमसे
आई ख्रिस्तियाना नी ब्राउन
पत्नी सुसान
राजगीत राणीचे स्तुती गीत
चलन ब्रिटिश पाउंड
मागील:
लॉर्ड हार्डिंग
भारताचे गव्हर्नर जनरल
इ.स. १८४८इ.स. १८५६
पुढील:
लॉर्ड कॅनिंग

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा