लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस

(लॉकहीड सी-१३० या पानावरून पुनर्निर्देशित)

लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस हे अमेरिकेच्या लॉकहीड कॉर्पोरेशन (आताची लॉकहीड मार्टिन)ने तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले लष्करी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरून चढू-उतरू शकते.

लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस
अमेरिकी वायुसेनेचे सी-१३० हर्क्युलिस
प्रकार लष्करी वाहतूक विमान
उत्पादक देश Flag of the United States अमेरिका
उत्पादक लॉकहीड मार्टिन
पहिले उड्डाण २३ ऑगस्ट १९५४
सद्यस्थिती सेवेत आहे
उपभोक्ते अमेरिकी वायुसेना
अमेरिकी मरिन कॉर्प्स
रॉयल वायुसेना
रॉयल कॅनडियन वायुसेना
उत्पादन काळ १९५४ - सद्य
उत्पादित संख्या २,५०० पेक्षा जास्त, २०१५ पर्यंत[]
प्रति एककी किंमत सी-१३०इ: $१.१९ कोटि[]
सी-१३०एच: $३.०१ कोटि[]

या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप[मराठी शब्द सुचवा] आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६०हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. भारतीय वायुसेनेने सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "C-130J Super Hercules". ३० जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b "सी-१३० हर्क्युलिस". U.S. Air Force. 2014-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.