ज्याचे शरीरास वा शरीराचे कोणत्याही अंगास 'लेपन' केले जाते तो लेप. पुरातन काळापासून ही पद्धत अस्तित्वात आहे. आजकाल याला फेसपॅक, मास्क अशी नावे आहेत.यात अनेक औषधी वनस्पतींच्या सालांची वस्त्रगाळ पावडर,ओल्या वनस्पतींचा रस,इत्यादी असु शकतात.त्यास पातळ करण्यासाठी त्यात पाणी, दुध वा आवश्यक तो तरल पदार्थ(तेल ईत्यादी) टाकतात.लेपातील घटक असणारी औषधी द्रव्ये, शरीरास असलेल्या रोमछिद्रांतुन शरीरात जाऊन आवश्यक ती औषधीक्रिया करतात. लावलेला लेप (विशेषतः चेहऱ्यावरील) तो पूर्ण वाळण्यापूर्वीच काढावा असा संकेत आहे.

सौंदर्यासाठी चंदन, हळद, बेसन, दूध, विविध फळांचे गर तसेच फळ व भाज्यांचे रस, साय, मुलतानी माती,मध इ. वस्तूंचे लेप तयार करून ठराविक वेळ चेहऱ्यावर ठेवून शक्यतो थंड किंवा मग गरम पाण्याने धुतले जातात.

जखमा बऱ्या होण्यासाठी ,रक्तस्राव थांबण्यासाठी किंवा त्याचा रोगांवर आराम व शरीराला थंडावा मिळण्यासाठी औषधी वनस्पतींचा लेप लावला जातो. आयुर्वेदात आजही ही पद्धत लोकप्रिय आहे.

हे सुद्धा पहा संपादन