लुडविग विटगेनस्टाईन

लुडविग विटगेनस्टाईन उर्फ लुडविग योसेफ योहान विटगेनस्टाईन (२६ एप्रिल, इ.स. १८८९:व्हियेना - २९ एप्रिल इ.स. १९५१:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे विसाव्या शतकातील एक मूलभूत आणि मौलिक विचार मांडणारे ऑस्ट्रियन-हंगेरियन तत्त्ववेत्ते होते. संपूर्ण पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानातील भाषिक विश्लेषण या नावाने ओळखली जाणारी तात्त्विक विचारसरणीवर विलक्षण प्रभाव निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. विश्लेषक तत्त्वज्ञानाला त्यांच्यामुळे एकदा नव्हे तर दोनदा कलाटणी मिळाली. पहिली, त्यांच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांनी आणि दुसऱ्यांदा विचारवंताच्या अनेक पिढ्यांवर त्यांच्या प्रभावाने, आंग्लभाषिक जगतातील तत्त्वज्ञानात्मक चळवळीचे स्वरूपच बदलून टाकले.[१] ट्रॅक्टटस लॉजिको फिलॉसॉफिकस आणि फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टीगेशन (पीडीएफ उपलब्ध)[२] या जगप्रसिद्ध ग्रंथांचे ते लेखक आहेत.त्यांच्या या दोन्ही ग्रंथांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील विश्लेषण परंपरेतील अनेक पातळीवरील विकासांना आकार टर दिलाच; शिवाय अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानेतर साहित्याला खूप मोठी प्रेरणा दिली. त्यांच्या गूढ, चित्तवेधक व्यक्तिमत्त्वाने अकादामिक क्षेत्राच्या बाहेर उत्तुंग झेप घेऊन तत्कालिन अनेक कलाकार, नाटककार, कवी, कादंबरीकार, संगीतकार आणि अगदी चित्रपट निर्मिकांवर भुरळ घातली.[३] विटगेनस्टाईन हे युरोप-पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली तत्त्ववेत्ते आणि काहीजणांच्या मते इमान्युएल कांट या तत्त्ववेत्त्यानंतरचे सर्वात महत्त्वाचे तत्त्ववेत्ते आहेत.[४]

तर्कशास्त्र, गणित आणि भाषा हे त्यांच्या चिंतनाचे विषय होते. ते बर्ट्रांड रसेलचे विद्यार्थी होते.

शैक्षणिक कारकीर्द संपादन

कौटुंबिक माहिती संपादन

विटगेनस्टाईन हे त्यांचे मातापित्याचे शेवटचे आठवे अपत्य होते. त्यांच्या चार भावांपैकी तिघांनी आत्महत्या केली. विटगेनस्टाईन यांचे पूर्वज ज्यू होते. त्यांच्या आजोबांनी - वडिलांच्या वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. विटगेनस्टाईन यांचे वडील कार्ल विटगेनस्टाईन हे धनाढ्य आणि यशस्वी उद्योजक होते. ऑस्ट्रिया-हंगेरी प्रांतातील पोलाद आणि लोह उद्योगाचे ते नेतेच होते. विटगेनस्टाईन यांची आई अतिशय सत्त्वशील, संगीतप्रेमी होती. विटगेनस्टाईन घराणे अत्यंत उच्च दर्जाचे सुसंस्कृत घराणे होते. या संगीतप्रेमी कुटुंबाकडे तत्कालिन कलाकारांचा आणि विशेषतः संगीतकारांचा राबता होता. अनेकांची त्यांच्याकडे उठबस होती. जर्मन पियानोवादक जोहान्स ब्राह्म्स सारखा रचनाकार या कुटुंबाचा मित्र होता.[५][६]

तत्त्वज्ञानातील योगदान संपादन

भाषेला तात्विक दृष्टीकोनातून मांडणे हे विटगेनस्टाईनचे सर्वात मोठे योगदान आहे. आज भाषाशास्त्रात तत्त्वज्ञानाचा उल्लेख कोणी केला की विटगेनस्टाईनचे नाव आपोआपच ध्यानात येते. विटगेनस्टाईनच्या लेखनाने खूप वादविवाद निर्माण केले आहेत, कधीकधी विटगेनस्टाईनच्या कार्याला तात्विक विरोधी म्हटले गेले आहे, परंतु असे म्हणणे चुकीचे ठरेल की विटगेनस्टाईनच्या आधीही तर्कशास्त्रकारांनी भाषा वापरली (जी सत्य ठरवण्यासाठी वापरली जात होती) जोर देत होती. तार्किक विश्लेषणावर होते. विटगेनस्टाईनचे शिक्षक बर्ट्रांड रसेल (ज्यांच्याकडून ते तर्कशास्त्र शिकले) यांचे तत्वज्ञानात तर्कशास्त्राला योग्य स्थान देण्यात मोठे योगदान आहे. विटगेनस्टाईनची तात्विक कारकीर्द मनोरंजक आहे कारण त्याने त्याच्या नंतरच्या कामांमध्ये त्याच्या पूर्वीच्या कामांचे खंडन केले. त्याच्या आधीच्या पुस्तकांमध्ये, विटगेनस्टाईन सत्यासाठी भाषेचे महत्त्व स्पष्ट करताना दिसतात, परंतु त्याच्या शेवटच्या पुस्तकात "तत्वज्ञानविषयक अन्वेषण" (जे मरणोत्तर संपादित केले गेले होते), विटगेनस्टाईन यांनी भाषेतील पक्षपाताचे वर्णन केले आहे. विटगेनस्टाईनचा हा निष्कर्ष तात्विक जगासाठी नवीन आणि महत्त्वाचा ठरला. सत्याचे वर्णन भाषेने केले जात नाही तर सत्य निर्माण केले जाते ही कल्पना विटगेनस्टाईन यांनी एक प्रकारे मांडली. सर्व पाश्चात्य तत्त्वज्ञान भाषेत रुजलेले आहे, परंतु भाषा आपल्याला सत्याचे एकच रूप दाखवते, ते सत्य जे आपण आपल्या विश्वासातून किंवा अनुभवातून निर्माण करतो. विटगेनस्टाईन भाषेच्या खेळाचा वारंवार उल्लेख करतात, ज्यामध्ये सहभागी काही सत्य व्यक्त करण्यासाठी भाषा तयार करतात आणि वापरतात. या गेमद्वारे, विटगेनस्टाईनने भाषेपासून वेगळे केलेले तथ्य आणि सत्य यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. त्यांच्या "तत्वज्ञानविषयक अन्वेषण" या मुख्य पुस्तकात ते म्हणतात की "बहुतेक वेळा जेव्हा आपण एखाद्या शब्दाच्या "अर्थ" बद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त भाषेतील त्या शब्दाच्या मांडणीबद्दल बोलत असतो".

मराठी विशेषांक संपादन

  • परामर्श दोन विटगेनस्टाईन विशेषांक प्रसिद्ध केले आहेत.

ग्रंथ संपदा (मूळ जर्मनमधून इंग्लिशमध्ये भाषांतरीत) संपादन

  • Tractatus Logico-Philosophicus (1921)
  • Philosophical Investigations (1953)
  • Remarks on the Foundations of Mathematics (1978)
  • Remarks on the Philosophy of Psychology, Vols. 1 and 2, (1980)[७]
  • The Blue and Brown Books (1958)
  • Philosophical Remarks (1975)[८]
  • Remarks on Colour (1991)
  • Remarks on Goethe's Theory of Colours Philosophical Grammar (1978)
  • On Certainty

हे पाहा संपादन

  • यू-ट्यूब : इंग्लिश चित्रफित : मालिका : तत्त्वज्ञान - लुडविग विटगेनस्टाईन - The School of Life

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Wittgenstein". www.philosophypages.com. 2019-03-13 रोजी पाहिले.
  2. ^ लुडविग. "विटगेस्टन," (PDF).
  3. ^ "Ludwig Wittgenstein | British philosopher". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2019-03-13 रोजी पाहिले.
  4. ^ Duncan J. Richter Ludwig Wittgenstein, http://www.iep.utm.edu/wittgens/
  5. ^ Duncan J. Richter, Ludwig Wittgenstein,http://www.iep.utm.edu/wittgens/
  6. ^ प्रा. शं. हि. केळशीकर, "विटगेनस्टाईनचे तत्त्वज्ञान", परामर्श, खंड २४ अंक ३, नोव्हेंबर-जानेवारी २००२-०३, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे.
  7. ^ Remarks on the Philosophy of Psychology, Volume 1.
  8. ^ Philosophical Remarks.