लुझनिकी स्टेडियम
लुझनिकी ऑलिंपिक संकुलामधील भव्य क्रीडा मैदान (रशियन: Большая спортивная арена Олимпийского комплекса Лужники) हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक स्टेडियम आहे. १९५६ साली भूतपूर्व सोव्हिएत संघात बांधले गेलेले व ७८,३६० आसनक्षमता असलेले लुझनिकी हे रशियामधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. आजवर हे स्टेडियम मुख्यत: फुटबॉल सामन्यांसाठी वापरले गेले आहे. युएफाच्या १९९९ युएफा युरोपा लीगसाठीचा अंतिम सामना तसेच २००८ सालच्या युएफा चँपियन्स लीगचा अंतिम सामना येथे खेळवण्यात आला होता.
लुझनिकी मैदान | |
---|---|
स्थान | मॉस्को, रशिया |
उद्घाटन | ३१ जुलै, इ.स. १९५६ |
आसन क्षमता | ७८,३६० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१९८० उन्हाळी ऑलिंपिक एफ.सी. स्पार्ताक मॉस्को |
रशियात होणाऱ्या २०१८ फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना लुझनिकी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत