लिओनार्ड निमॉय

अमेरिकेतील अभिनेता, दिग्दर्शक, कवी, संगीतकार आणि छायाचित्रकार


लिओनार्ड सायमन निमॉय (२६ मार्च, इ.स. १९३१:बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५:बेल एर, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, कवी, गायक आणि छायाचित्रकार होता. निमॉयने स्टार ट्रेक या दूरचित्रवाणीमालिकेत स्पॉकची भूमिका केली होती.

लिओनार्ड निमॉय
Leonard Nimoy by Gage Skidmore.jpg
मे, २०११मध्ये फीनिक्स येथील कॉमिकॉन परिषदेत निमॉय
पूर्ण नाव लिओनार्ड सायमन निमॉय
जन्म २६ मार्च १९३१ (1931-03-26)
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
मृत्यू २७ फेब्रुवारी, २०१५ (वय ८३)
बेल एर, कॅलिफोर्निया, अमेरिका
कारकीर्द काळ १९५१-२०१३
पत्नी नाव सँड्रा झोबर (१९५४-१९८७, घ), सुझन बे (१९८९-२०१५)
अपत्ये ॲडम निमॉय, जुली निमॉय
संकेतस्थळ www.LeonardNimoyPhotography.com

निमॉयने आय ॲम नॉट स्पॉक (१९७५) आणि आय ॲम स्पॉक (१९९५) ही दोन आत्मचरित्रात्मक पुस्तके लिहिली.