लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, मैदा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टिकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.

बेसनाचे लाडू
बुंदीचे लाडू
नरियळाचे लाडू
बेसनाचे लाडू
सिमोलिना लाडू
काजू व बदामाचे लाडू

लाडवांचे प्रकार

संपादन

घटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनवले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. यात मुगाच्या वाटल्या डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू हे प्रकार यात मोडतात. खेरीज मोतीचुराचे (अर्थात बारीक बुंदीचे) लाडू हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू,राजगिऱ्याचे लाडू, कुटकीचे [] लाडू, कोदोचा [] लाडू, अळिवाचे[] लाडू, मेथीचे लाडू' ' इत्यादी प्रकारांची गणना होते. याशिवाय ' 'रव्याचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, पोळीचे लाडू, डिंकाचे लाडू, पोह्याचे लाडू, अळीवाचे लाडू दाण्याचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनवलेले प्रकारही आहेत.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ कुटकी : एक प्रकारचे धान्य.
  2. ^ कोदो : एक प्रकारचे धान्य.
  3. ^ अळीव : एक प्रकारचे धान्य.

हेदेखील पाहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "लाडवांचे प्रकार". 2012-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जुलै २०१२ रोजी पाहिले.