लक्ष्मीकांत पार्सेकर

(लक्ष्मीकांत यशवंत पार्सेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

लक्ष्मीकांत यशवंत पार्सेकर ( ४ जुलै १९५६) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत[१]. अनेक वर्षे भाजपचे सदस्य राहिलेले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्य केलेल्या पार्सेकर ह्यांना गोव्यामध्ये भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे श्रेय दिले जाते.

लक्ष्मीकांत पार्सेकर

कार्यकाळ
८ नोव्हेंबर २०१४ – १४ मार्च २०१७
मागील मनोहर पर्रीकर
पुढील मनोहर पर्रीकर
मतदारसंघ मांद्रे

जन्म ४ जुलै, १९५६ (1956-07-04) (वय: ६७)
हरमल, पेडणे तालुका, गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नियुक्ती केल्यानंतर पर्रीकरांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीमध्ये पार्सेकर ह्यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. पार्सेकरांनी ८ नोव्हेंबर २०१४ रोजी पदाची शपथ घेतली. २ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर २०१७ विधानसभा निवडणुकीत पार्सेकर ह्यांना पराभव पत्कारावा लागला. भारतीय जनता पक्षाने स्थानिक पक्षांना हाताशी धरून सरकार स्थापले परंतु पार्सेकर ह्यांना मुख्यमंत्रीपद टिकवता आले नाही.

संदर्भ संपादन

  1. ^ "पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री". ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.