लक्ष्मण नारायण जोशी (५ मार्च, इ.स. १८७३:पुणे - १ जुलै, इ.स. १९४७:पुणे) हे एक मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक, लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार होते. त्यांनी शेक्सपियरच्या तीन नाटकांचे मराठीत रूपांतर केले आहे.

लक्ष्मण नारायण जोशी
जन्म नाव लक्ष्मण नारायण जोशी
जन्म ५ मार्च, इ.स. १८७३
पुणे
मृत्यू १ जुलै, इ.स. १९४७
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी

इ.स. २००७मध्ये ल.ना. जोशींच्या निधनाला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरील लेखकाच्या वंशजांचा प्रताधिकार संपला. याचा लाभ घेऊन, डायमंड प्रकाशनाने त्यांची तीन पुस्तके पुनःप्रकाशित केली आहेत, यावरून त्यांचे लेखन किती कालातीत होते हे समजून यावे.

कारकीर्द संपादन

मॅट्रिकपर्यंत पुण्यात शिक्षण झाल्यावर जोशी यांनी मुंबईत काही काळ पशुवैद्यकाचे शिक्षण घेतले. मुंबईत असतानाच ते ’इंदुप्रकाश’ व गुराखी’ या पत्रांतून लेखन करू लागले. १८९९ साली पुण्यात रँड व आवर्स्ट यांचे खून झाले, त्याविषयी जोशी यांनी ’गुराखी’त लेख लिहिले. त्याबद्दल त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण वेळ लेखन करायचे असे ठरविले. निरनिराळ्या एकवीस विषयांवर जोशी यांनी सुमारे दीडशे पुस्तके लिहिली. पंडित सातवळेकरांच्या वैदिक वाङ्‌मय प्रकाशनाच्या कार्यात ल.ना. जोशी यांनी मोठे संपादकीय साह्य केले.

ल.ना.जोशी यांची साहित्यसंपदा (कंसात प्रसिद्धी साल) संपादन

  • "चरित्रे"
    • एकनाथ (१९२९)
    • जर्मनीचे महत्त्वाकांक्षी कैसर (१९१७)
    • गणपतराव जोशी (१९२३)
    • बॅ. गांधी यांचे चरित्र (१९१४)
    • चितोडची वीर अरुण (१९२०)
    • तुकाराम (१९२९)
    • नामदेव (१९३०)
    • बाजीराव (१९३५)
    • महाराणा प्रतापसिंह (१९२२)
    • ज्ञानेश्वर (१९२९)
  • "भाषांतरे"
    • अथर्ववेदाचे अन्वयासहित भाषांतर
    • ऋग्वेदाचे कविताबद्ध रूपांतर
    • कपिध्वज (१९०४): शेक्सपियरच्या किंग जॉन या नाटकाचे मराठी रूपांतर
    • डाकिनीविलास (१९१९) : शेक्सपियरच्या मॅकबेथ या नाटकाचे मराठी रूपांतर
    • श्री काशिनाथोपाध्याय विरचित धर्मसिंधू (मराठी भाषांतरासहित)
    • सार्थ छंदोबद्ध पुरुषसूक्त (१९३४)
    • जीवनाथ विरचित भाव कुतूहल (१९२१). यात ऋग्वेदादी संहिता, धर्मसिंधू, अध्यात्मरामायण आणि विविध स्तोत्रे यांची सटीप भाषांतरे आहेत.
    • विकारविहार (१८८१) : शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकाचे मराठी रूपांतर
  • "स्वतंत्र पुस्तके"
    • टेलिपथी इन्स्ट्रक्टर-मानसिक संदेश शिक्षक (१९२०)
    • धंदे शिक्षक (साल?)
    • फलाहारचिकित्सा (साल?). या पुस्तकाची नवी आवृत्ती डायमंड प्रकाशनाने काढली आहे (२००९)
    • सचित्र ब्रह्मयोग विद्याशिक्षण (१९२१). या ग्रंथाची नवी आवृत्ती ’डायमंड’ने काढली आहे. (साल?)
    • महिला जीवन म्हणजेच गृहिणी कर्तव्य (१८८६?)
    • जन्ममहिन्यानुसार माझे भविष्य (सौरपद्धतीप्रमाणे) (साल?). या पुस्तकाची ’डायमंड’ने नवी आवृत्ती काढली आहे (साल?)
    • राष्ट्रीय इंग्रजी शिक्षक भाग १,२,३ (१९३५-पाचवी आवृत्ती)
    • लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश (१९२१)
    • वर्णजल चिकित्सा शिक्षक (१९१७)
    • विनोदलहरी (१९१३)
    • शांतिनिकेतनमाला (१९२३)
    • सुगंधी शिक्षक (१९२५)
  • "कादंबऱ्या"
    • हा सारी भाऊबंदकी (१९०२). व आणखी १० कादंबऱ्या - नावे उपलब्ध नाहीत.

ल. ना. जोशी खुप