गणपतराव जोशी (१५ ऑगस्ट, इ.स. १८६७ - ७ सप्‍टेंबर, इ.स. १९२२) हे एक गद्य नाटकांत काम करणारे मराठी नट होते. मराठी संगीत नाटकांच्या भरभराटीच्या काळात केवळ गद्य नाटकांसाठी त्यांनी इ.स. १८८१ मध्ये शाहूनगरवासी नाटक मंडळी स्थापन केली.

नाटके आणि त्यांतल्या त्यांच्या भूमिका संपादन

  • ऑथेल्लो (झुंझारराव)
  • त्राटिका (प्रतापराव)
  • मॅक्बेथ (मानाजीराव)
  • राणा भीमदेव (राणा भीमदेव)
  • रामदास (रामदास)
  • संत तुकाराम (तुकाराम)
  • हॅम्लेट (हॅम्लेट)