न्यूहॅम (लंडन बरो)
(लंडन बरो, न्यूहॅम या पानावरून पुनर्निर्देशित)
लंडनचा बरो न्यूहॅम (इंग्लिश: London Borough of Newham) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहराचा एक बरो आहे. हा बरो सिटी ऑफ लंडनपासून ५ मैल अंतरावर थेम्स नदीच्या उत्तर काठावर वसला आहे. न्यूहॅम बरो इंग्लंडमधील सर्वात विभिन्न लोकवस्तीचा मानला जातो. येथील १२ टक्के लोक भारतीय वंशाचे तर २४ टक्के लोक मुस्लिम धर्मीय आहेत.
न्यूहॅम London Borough of Newham |
|
लंडनचा बरो | |
ग्रेटर लंडनमधील स्थान | |
देश | युनायटेड किंग्डम |
राज्य | इंग्लंड |
काउंटी | ग्रेटर लंडन |
स्थापना वर्ष | १ एप्रिल १९६५ |
क्षेत्रफळ | ३६.२२ चौ. किमी (१३.९८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,४०,१०० |
- घनता | ६,६२९ /चौ. किमी (१७,१७० /चौ. मैल) |
newham.gov.uk |
लंडनमध्ये भरवल्या जाणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आलेले ऑलिंपिक मैदान ह्याच बरोच्या स्ट्रॅटफर्ड जिल्ह्यात स्थित आहे.