रोहिणी गोडबोले

भारतीय भौतिक शास्त्रज्ञ

डॉ.रोहिणी गोडबोले (१२ नोव्हेंबर, १९५२ - २५ ऑक्टोबर, २०२४) या एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होत्या. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. त्या फील्ड थिअरी आणि फेनोमेनोलॉजी या विषयात तज्ज्ञ होत्या. गोडबोले सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे प्राध्यापक होत्या.[]

डॉ.रोहिणी गोडबोले

डॉ.रोहिणी गोडबोले
पूर्ण नावडॉ.रोहिणी गोडबोले
जन्म १२ नोव्हेंबर, १९५२
मृत्यू २५ ऑक्टोबर, २०२४ (वय ७१)[]
निवासस्थान बंगळूरू
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र पदार्थविज्ञान
कार्यसंस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू

भारत सरकारने त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानासाठी २०१९ साली पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तसेच फ्रेंच सरकारद्वारे Ordre National du Mérite हा फ्रान्समधील प्रतिष्ठित पुरस्कार दिला.[]

शैक्षणिक पार्श्वभूमी

संपादन

गोडबोले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून झाले. त्यांनी १९७२ साली बी.एस.सी.ची पदवी मिळवली, तेव्हा त्या पुणे विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून त्यांनी एम.एस.सी.ची पदवीही पहिल्या क्रमांकाने मिळवली.

१९७९ साली अमेरिकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कमधून त्या पीएच्.डी.झाल्या.

त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले.

संशोधन कारकीर्द

संपादन

पीएच्.डी.नंतर ३ वर्षे गोडबोले यांनी मुंबईत टी.आय.एफ.आर.मध्ये काम केले. नंतर ४ महिने मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि १२ वर्षे मुंबई विद्यापीठात सुरुवातीला व्याख्याती आणि नंतर अधिव्याख्याती म्हणून काम केले. त्या सध्या (२०१९ साली) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू येथे काम करतात. कण भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि कोलायडर भौतिकी या विषयांत त्यांनी चाळीसहून अधिक वर्षे संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

योगदान

संपादन

डॉ. गोडबोले युरोपीय संशोधन प्रयोगशाळा, सर्नमधील आंतरराष्ट्रीय लिनियर कोलायडरच्या इंटरनॅशनल डीटेक्टर ॲडव्हायझरी ग्रुप (आयडीएजी) मध्ये २००७ ते २०१२ या कालावधीत सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल डीटेक्टर ॲडव्हायझरी ग्रुप आयएलसी डीटेक्टरचे संशोधन, संशोधन संचालनालयाचा विकास यावर आणि डीटेक्टर डिझाईन गटांवर लक्ष ठेवतो.

त्या भारतीय विज्ञान अकादमीच्या विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांच्या पुढाकाराबद्दल काम करणाऱ्या सदस्य गटाच्या अध्यक्षा आहेत.

  • 'सायन्स करीयर फॉर इंडियन विमेन' या विषयावरील भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अहवालाच्या सहलेखिका
  • 'लीलावतीज डॉटर्स' या १०० निवडक भारतीय संशोधिकांवरील पुस्तकाच्या संपादिका आणि सहलेखिका[]
  • 'द गर्ल्स गाइड टु ए लाइफ इन सायन्स' या पुस्तकाच्या सहसंपादिका[]

पुरस्कार

संपादन
  • फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट सन्मान, फ्रान्स आणि भारत यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्प तसेच मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल (२०२१)[] 
  • २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने गौरव[]
  • इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे देण्यात येणारा आर. डी. बिर्ला स्मृती पुरस्कार ,२०१९ []
  • आय.आय.टी., मुंबईच्या मानांकित माजी विद्यार्थी म्हणून गौरव[]
  • न्यू इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे देवी पारितोषिक, ऑगस्ट २०१५[१०]
  • स्त्री शक्ती पुरस्कार, आदित्य प्रतिष्ठान, पुणे २०१५ [११]
  • २०१३मध्ये एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी देऊन सन्मान
  • सी.व्ही.रामन महिला विज्ञान पुरस्कार, स्वदेशी विज्ञान आंदोलन कर्नाटक यांच्यातर्फे, २०१०
  • भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सत्येंद्रनाथ बोस पदक, २००९[१२]
  • जे.सी.बोस फेलोशिप, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, २००८-२०१८ [१३]
  • सैद्धांतिक भौतिक शास्त्रातील कामगिरीसाठी एशियाटिक सोसायटीकडून मेघनाद साहा पदक, २००७

संदर्भ

संपादन
  1. ^ "Noted physicist Rohini Godbole, a staunch advocate for Indian women in science, passes away". indianexpress.com. 25 October 2024.
  2. ^ "Rohini M. Godbole". chep.iisc.ac.in. 2022-05-15 रोजी पाहिले.
  3. ^ Godbole, Rohini M. (2002). "Being a Woman Physicist: An Indian Perspective". AIP Conference Proceedings. AIP. doi:10.1063/1.1505289.
  4. ^ "Lilavatis Daughters | Women in Science | Initiatives | Indian Academy of Sciences". www.ias.ac.in. 2019-03-08 रोजी पाहिले.
  5. ^ Ramaswamy, Ram; Godbole, Rohini; Dubey, Mandakini (2014-03-11). The Girl's Guide to a Life in Science (इंग्रजी भाषेत). Young Zubaan, an imprint of Zubaan. ISBN 9789381017555.
  6. ^ "पुण्याच्या प्रा.गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान | eSakal". www.esakal.com. 2021-01-14 रोजी पाहिले.
  7. ^ "हा पद्मश्री पुरस्कार सर्व वैज्ञानिक महिलांचा". Maharashtra Times. 2019-01-30 रोजी पाहिले.
  8. ^ "गोडबोले, बर्मा यांना पुरस्कार". Maharashtra Times. 2021-01-14 रोजी पाहिले.
  9. ^ saamana.com. "लीलावतीचा वारसा | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-08 रोजी पाहिले.
  10. ^ "Devi Awards 2015". www.eventxpress.com. 2019-03-17 रोजी पाहिले.
  11. ^ "Awards and Special Attainments | Rohini M Godbole" (इंग्रजी भाषेत). 2019-03-17 रोजी पाहिले.
  12. ^ "INSA". archive.is. 2019-03-17 रोजी पाहिले.
  13. ^ "Awards and Special Attainments | Rohini M Godbole" (इंग्रजी भाषेत). 2019-03-17 रोजी पाहिले.