रोझेलिन कार्टर
एलीनॉर रोझेलिन कार्टर ( /ˈroʊzəlɪn/ ROH -zə-lin ; १८ ऑगस्ट, १९२७: प्लेन्स, जॉर्जिया, अमेरिका - १९ नोव्हेंबर, २०२३:प्लेन्स, जॉर्जिया, अमेरिका) या एक अमेरिकन लेखिका आणि कार्यकर्त्या होत्या. या १९७७ ते १९८१ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पत्नी म्हणून अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अमेरिकेत आणि जगभरही काम केले. [१]
रोझलिन कार्टर | |
राष्ट्राध्यक्ष | जिमी कार्टर |
---|---|
जन्म | १८ ऑगस्ट, १९२७ |
मृत्यू | १९ नोव्हेंबर, २०२३ (वय ९६) |
शिक्षण | जॉर्जिया साउथवेस्टर्न कॉलेज |
पूर्वजीवन
संपादनकार्टर यांचा जन्म एलीनॉर रोझेलिन स्मिथ नावाने प्लेन्स(जॉर्जिया) येथे झाला. [२] त्यांचे वडील विल्बर्न एडगर स्मिथ हे शेतकरी, कार मेकॅनिक आणि बसचालक होते तर आई फ्रांसिस अलीथिया स्मिथ ही शिक्षिका असून शिवाय ती कपडे शिवून देत असे आणि टपाल कार्यालयातही काम करीत असे. रोझेलिन आपल्या चार भावंडांपैकी सगळ्यात मोठी होती. तिला तिच्या आजीचेच नाव दिले होते.
स्मिथचे लहानपण गरिबीत गेले. तिने नंतर सांगितले की तिला आणि तिच्या भावंडांना आपण गरीब आहोत हे माहितीच नव्हते, कारण जरी त्यांच्या कुटुंबाकडे "जास्त पैसा नव्हता [...] तसेच इतर कोणाकडेही नव्हते, आमच्या समजानुसार, आमची परिस्थिती ठीकठाकच होती." [३] [४] [५] आपल्या वयाच्या इतर मुली आसपास नसल्याने स्मिथ तिच्या लहानपणी मुलांबरोबर खेळत असे. तिला इमारतींची चित्रे काढण्याचा छंद होता तसेच विमानांमध्ये रस होता. यामुळे तिच्या आईवडीलांना वाटत असे की रोझेलिन एक दिवस स्थापत्यविशारद होईल. [६]
रोझेलिनने जिमी कार्टरशी १९४५ मध्ये पहिल्यांदा ओळख झाली. [७] [८] रोझेलिनने फेब्रुवारी १९४६ मध्ये जिमीशी लग्न करण्यास संमती दिली आणि पुढचे शिक्षण थांबवले. [९] ७ जुलै, १८४६ रोजी त्यांनी प्लेन्स गावात लग्न केले.[१०] या जोडप्याला चार मुले झाली: जॉन विल्यम "जॅक" (जन्म १९४७), जेम्स अर्ल "चिप" तिसरा (जन्म १९५०), डोनेल जेफ्री "जेफ" (जन्म १९५२), आणि एमी लिन (जन्म १९६७). [११]
राजकारण
संपादनजॉर्जियाची फर्स्ट लेडी
संपादन१९७० मध्ये जिमी कार्टर जॉर्जियाचे गव्हर्नर झाले तेव्हा रोझेलिन राज्याच्या प्रथम महिला झाल्या. त्यावेळी त्यांनी आपला वेळ मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. [१२] [१३] [१४]
अमेरिकेच्या प्रथम महिला (१९७७-१९८१)
संपादनजानेवारी १९७७मध्ये जिमी कार्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर रोझेलिन आणि जिमी कार्टर त्यांच्या मिरवणुकीत पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूवरुन हातात हात घालून चालत व्हाइट हाउसमध्ये गेले. जिमी कार्टर जेव्हा जॉर्जियाचे गव्हर्नर झाले त्या दिवशी रोझेलिनने जो गाऊन घातला होता तोच गाऊन तिने सहा वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या सोहळ्यात घातला. [१५]
जिमी कार्टरच्या सद्दीच्या सुरुवातीसच रोझेलिनने घोषित केले की ती अमेरिकेच्या पारंपारिक प्रथम महिलांप्रमाणे ती वागणार नाही. [१०] तिच्या पतीच्या कारभारादरम्यान, रोझलिन त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात खांद्याला खांदाल लावून उभ्या राहिल्या. [१६]
अंतिम दिवस
संपादनमे २९२३ मध्ये, कार्टर सेंटरने रोझेलिनना स्मृतिभ्रंश झाल्याचे निदान जाहीर केले. त्यांनी आपल्या पतीसोबत घरीच राहण्याचा निर्णय घेतला. [१७] [१८] १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी, रोझेलिन कार्टर स्वतःहून अंतिम दिवस घालविण्यासाठीची तयारी करू लागल्या [१९] आणि दोनच दिवसांनी वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचा प्लेन्स शहरातील त्यांच्या घरीच त्यांचे निधन झाले. [२०] [२१] [२२]
संदर्भ
संपादन- ^ Carballo, Rebecca (20 November 2023). "Rosalynn Carter Lauded for Humanitarian Work, Mental Health Advocacy". New York Times. 20 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "A timeline of key moments from former first lady Rosalynn Carter's 96 years". AP News (इंग्रजी भाषेत). 2023-11-19. 2023-11-20 रोजी पाहिले.
- ^ Carter, Rosalynn (1994). First Lady from Plains. University of Arkansas Press. p. 4. ISBN 978-1-61075-155-1. November 20, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 19, 2023 रोजी पाहिले.
- ^ Wertheimer, Molly (2004). Inventing a Voice: The Rhetoric of American First Ladies of the Twentieth Century. Rowman & Littlefield. p. 343. ISBN 978-0-7425-2971-7. November 20, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 19, 2023 रोजी पाहिले.
- ^ Carter, Rosalynn (May 6, 2010). "Rosalynn Carter: Solving the Mental Crisis for Our Children". Huffington Post. September 21, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 7, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Where I'm From". Atlanta. February 1, 2012. April 21, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Jimmy and Rosalynn Carter: A love story for the ages". Q2 News (KTVQ) (इंग्रजी भाषेत). 2023-11-20. 2023-11-20 रोजी पाहिले.
- ^ O'Brien, p. 253.
- ^ Godbold, pp. 58–59.
- ^ a b Kaufman, p. 119.
- ^ Sager, Jessica (November 17, 2023). "Jimmy Carter and Rosalynn Carter's Relationship Timeline". People. November 19, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 19, 2023 रोजी पाहिले.
- ^ Lindsay, p. 229.
- ^ Curry, Nan (August 13, 1971). "First Lady lauds Battey progress on mental aid". Rome News-Tribune. March 17, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 31, 2017 रोजी पाहिले.
- ^ Archived at Ghostarchive and the PsychiatryLectures (September 25, 2011). "Rosalynn Carter on mental health policy 1982". Youtube.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-04-21. 2023-11-20 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link): PsychiatryLectures (September 25, 2011). "Rosalynn Carter on mental health policy 1982". Youtube.com.
- ^ Rosalynn Carter, First Lady from Plains, Houghton Mifflin Co., Boston, 1984: p. 6, 148
- ^ Carter, Rosalynn (1984), p. 185.
- ^ "Carter Family Statement about Health of First Lady Rosalynn Carter". Carter Center. May 30, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 30, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Former first lady Rosalynn Carter has dementia, Carter Center says". CNN. May 30, 2023. May 30, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 30, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rosalynn Carter, wife of Jimmy Carter, joins husband in hospice care". द गार्डियन. November 17, 2023. November 17, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 18, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rosalynn Carter, former first lady and tireless humanitarian who advocated for mental health issues, dies at 96". NBC News. November 19, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 19, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rosalynn Carter, former first lady, dies at age 96". CBS News. November 19, 2023. November 20, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 19, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Schedule of Observances for Former First Lady Rosalynn Carter". The Carter Center. November 19, 2023. November 20, 2023 रोजी पाहिले.