विद्युतप्रवाह रोधणाऱ्या, अर्थात विद्युतप्रवाहास अडथळा आणणाऱ्या, घटकाला रोधक (इंग्लिश: Resistor, रेझिस्टर ;) म्हणतात. रोधकातून विद्युतप्रवाह वाहवण्यासाठी त्याच्या टोकांदरम्यान विद्युतदाब लावावा लागतो. रोधकाच्या विद्युतप्रवाह रोधण्याची क्षमतेला रोध असे म्हणतात. विद्युतदाब, विद्युतप्रवाह व रोध यांचा संबंध ओहमाच्या नियमानुसार खालील सूत्रात मांडला जातो :

अ‍ॅक्शियल-लीड प्रकारातील रोधक


वरील सूत्रात "V म्हणजे विद्युतदाब, "I" म्हणजे विद्युतप्रवाह, "R" म्हणजे रोध आहे.

रोधकाचा रोध ओहम या एककात मोजला जातो. ओहम एकक Ω या चिन्हाने दर्शवतात.

प्रमुख प्रकार

संपादन
 
पोटॅनशीओमिटर

अचल रोधक

संपादन

ज्या रोधकांचा रोध बदलता येत नाही, सदैव स्थिर असतो, त्यांना अचल रोधक (इंग्लिश:Fixed resistors) म्हणतात.

चल रोधक

संपादन

ज्या रोधकांचा रोध बदलता येतो, त्यांना चल रोधक (इंग्लिश:Variable resistors) म्हणतात.

मानरेखनाच्या पद्धती

संपादन

रोधकाचा रोध ओहम या एककात मोजतात. कार्बन कंपोझिशन, कार्बन फिल्म, मेटल ऑक्साइड ह्या प्रकारातील रोधक हे आकारमानाने अतिशय लहान असल्यामुळे त्यावर त्याचे मान छापणे कटकटीचे व खर्चिक होते; त्यामुळे अशा प्रकारच्या लहान रोधकावर त्याचे मान इलेक्ट्रॉनिक रंगसंकेत पद्धतीने छापले जातात.

बाह्य दुवे

संपादन